prarthana behere 
मनोरंजन

प्रार्थना बेहेरे आधी होती, टीव्ही रिपोर्टर; वाचा तिचा इंटरेस्टिंग करिअर प्रवास

प्रार्थना बेहेरे, अभिनेत्री

प्रीमियर - प्रार्थना बेहेरे, अभिनेत्री
मीडिया आणि माझा संबंध तसा उशिरा, म्हणजे शिक्षण पूर्ण केल्यावर आला. मी मूळची बडोद्याची. तिथे बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी मुंबईला पदव्युत्तर शिक्षणासाठी आले. तिथे मी जर्नालिझममध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

तिथूनच माझा मीडियाशी संपर्क यायला सुरुवात झाली. मी पत्रकारितेच्या कामाला सुरुवात केली आणि स्टार न्यूजला माझे काम सुरू झाले. तिथे मी ‘पेज थ्री’ न्यूजसाठी काम करायचे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटिंना भेटायला, त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला मिळाले. 

तीन मिनिटांची स्टोरी करतानाही मला खूप काही शिकायला मिळाले. अगदी अमिताभ बच्चन यांचा देखील इंटरव्ह्यू मला घ्यायला मिळाला. पत्रकारितेचा प्रवास सुरू असताना अनेक कलाकारांशी बोलता आले, ओळख झाली. मला अनेक जण म्हणायचे, ‘तू का नाही काम करत चित्रपटात?’ परंतु माझा असा काही विचारच नव्हता. जॅकी श्रॉफ अनेकदा म्हणाले, ‘तू चित्रपटात काम कर.’  रेणुका शहाणे ‘रिटा’ सिनेमा करत होत्या. तेव्हा त्या सिनेमासाठी मी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. अर्थात, त्याला कधी कधी छोट्यामोठ्या भूमिकाही करतात. तशा मी एक-दोन छोट्या भूमिकाही केल्या. हे सगळे होत असताना मी माझे फोटो शूट केले. माझा मित्र हर्ष नरुला एकता कपूरकडे मार्केटिंग डिपार्टमेंटला होता.

मी त्याला माझे फोटो दिले होते. त्याने ते फोटो तिथे दिले आणि मला एक दिवस अचानक ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या ऑडिशनला बोलावले. मग माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ती मालिका साधारण दीड वर्ष चालली. आता पत्रकारिता, दिग्दर्शक, टीव्ही मालिकांमध्ये अभिनय असे काम केल्यावर मग आता चित्रपट करावे, असे वाटत होते. तशी संधी मला ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’च्या रूपाने मिळाली. मग मी मागे वळूनच पाहिले नाही. जवळपास १४-१५ चित्रपटांत मी काम केले. आता येत्या वर्षीही माझा नवा चित्रपट येत आहे. त्याचे शूटिंग लंडन येथे केले आहे.

मी एका मध्यमवर्गीय घरातून आलेली मुलगी आहे. ‘ब्रेड आणि बटर’साठी या क्षेत्रात मी काम करत होते. तेव्हा फारशी फोकस्ड नव्हते. आता माझे अभिषेक जावकरशी लग्न झाले आहे. आता मी माझ्या कामाबाबत अधिक फोकस्ड झाले आहे. ‘रेड बस स्टुडिओ’ नावाची आमची प्रॉडक्‍शन कंपनी आहे. अभिषेक दिग्दर्शक आहे, लेखक आहे आणि निर्माताही आहे. त्यामुळे आता मला प्रीप्रॉडक्शन, पोस्ट प्रॉडक्‍शनमध्ये जास्त रस वाटतो. असा ‘पेज थ्री’ रिपोर्टरपासूनचा माझा मीडियातील प्रवास सुरू झाला व मग सहायक दिग्दर्शक, मालिका कलाकार, सिनेमामधील अभिनय करत प्रॉडक्‍शनपर्यंत आला आहे. 

(शब्दांकन : स्मिता दोडमिसे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

BRICS Declaration: ‘ब्रिक्स’ची एकजुटीची हाक; युद्धखोरांना आरसा, नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर

SCROLL FOR NEXT