Prarthana Behere 
मनोरंजन

Prarthana Behere: पूजा सावंतच्या साखरपुड्यातील खास क्षण; प्रार्थना बेहेरेनं शेअर केला व्हिडीओ

Prarthana Behere: नुकताच प्रार्थनानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजाच्या साखरपुड्यातील खास क्षण दिसत आहेत.

priyanka kulkarni

Prarthana Behere: अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. त्यांच्या साखरपुड्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि तिचा पती अभिषेक जावकर यांनी देखील पूजाच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. नुकताच प्रार्थनानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजाच्या साखरपुड्यातील खास क्षण दिसत आहेत.

प्रार्थनानं शेअर केला व्हिडीओ

प्रार्थना बेहेरेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गश्मीर महाजनी, भूषण प्रधान आणि वैभव तत्ववादी हे देखील दिसत आहेत. या व्हिडीला प्रार्थनानं कॅप्शन दिलं, "पूजा आणि सिद्धेश तुमचे अभिनंदन" प्रार्थनानं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:

प्रार्थना बेहेरेनं पूजाच्या साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. प्रार्थनानं व्हाईट साडी, मोकळे केस आणि निळ्या बांगड्या असा लूक पूजाच्या साखरपुड्यासाठी केला होता.

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. हिरवी साडी, नथ आणि गोल्ड ज्वेलरी असा लूक पूजानं केला होता. सध्या नेटकरी पूजा आणि सिद्धेशवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Marital Dispute: पत्नीच्या प्रेमसंबंधातून धर्मांतराचा कट? पत्नीच्या वागण्यात बदल झाल्याचा पतीचा दावा, मुंबईतील बँकेकडे मोठी मागणी

Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

SCROLL FOR NEXT