Prarthana Behere shared Morning vibes video sakal
मनोरंजन

Prarthana Behere: प्रार्थनाच्या त्या व्हिडिओनं पोरांची उडवली झोप.. अंथरूणातच..

प्रार्थनाने भल्या पहाटे एक व्हिडिओ शेयर केला आहे.

नीलेश अडसूळ

prarthana behere: ‘मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सिने सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीगाठ’ मालिकेतील नेहाच्या पात्राने पुन्हा तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवंल आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची बरीच हवा आहे, नुकताच तिने एक व्हिडिओ शेयर केला आहे, तो पाहून तर चाहते वेडे झाले आहेत.

(Prarthana Behere shared Morning vibes video)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

प्रार्थनाने मराठीच नव्हे तर हिंदी भाषेतही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘ती अँड ती’, ‘फुगे’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारखे मराठी चित्रपट केले आहेत. ती सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. आज तिची एक पोस्ट हा चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे मॉर्निंग वाईब्स पाहून चाहत्यांची सकाळ चांगलीच गोड झाली आहे.

प्रार्थनाने एक सुंदर विडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तिने 'आखोमे बसे हो.. पण दूर हो गये' या लव्ह सॉन्ग वर सुंदर डान्स केला आहे. झोपेतून उठून बेडवरच हा व्हिडिओ बनवल्याने तिने या व्हिडिओला मॉर्निंग वाईब्ज असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये तिने ब्लॅक अँड व्हाईट नाइट सूट घालून गोड हसत काही पोज दिल्या आहेत. तिने सकाळीच हा व्हिडिओ पोस्ट केल्याने तिचे गोड हसू पाहून अनेकांची सकाळ गोड झाली आहे.

प्रार्थनाच्या या व्हीडिओवर कमेंटचा पाऊस पडला आहे. तु किती गोड दिसतेस, तुझ्या प्रेमात पडलो अशा अनेक कमेंट आल्या आहेत. तर काहींनी टीकाही केली आहे. तु कशी दिसतेस?, आंघोळ करून ये आधी.., येडे चाळे बंद कर.. अशा कमेंटही या व्हिडिओला मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT