मनोरंजन

Prasad - Amruta Wedding: प्रसाद जवादे - अमृता देशमुखचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न

बिग बॉस फेम प्रसाद - अमृताचा लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत

Devendra Jadhav

Prasad - Amruta Wedding: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख. प्रसाद - अमृताच्या लग्नाची चर्चा गेले अनेक महिने सुरु होती. अखेर दोघांचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला

प्रसाद - अमृताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. दोघांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

(prasad jawade amruta deshmukh wedding photos viral on social media)

प्रसाद - अमृताच्या लग्नाला मराठी कलाकारांची उपस्थिती

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या लग्नाला मराठी कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. दोघांचे अनेक मित्र इंडस्ट्रीत आहेत. त्यामुळे दोघांच्या लग्नाला नम्रता संभेराव, ओंकार राऊत, सिद्धार्थ खिरीड, आशुतोष गोखले, प्रार्थना बेहेरे हे कलाकार उपस्थित होते.

या सगळ्या कलाकारांनी अमृता - प्रसादच्या लग्नात धम्माल केली. प्रसाद - अमृताच्या हळद - मेहंदी - संगीत अशा अनेक विधींमध्ये हे सर्व कलाकार उपस्थित होते.

प्रसादने हातावर लिहीलं अमृताचं हे खास नाव

प्रसाद - अमृताच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. या फोटोत प्रसादने त्याच्या हातावर अमृतमय जाहलो अशी खास मेहंदी कोरलीय. या दोघांच्या या फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी पसंती दर्शवलीय.

याशिवाय हळद आणि संगीत सोहळ्यात प्रसाद - अमृताने धम्माल डान्स केला. अमृताच्या बाबांनी लाडक्या लेकीसाठी खास कविता म्हटली.

अशी झाली प्रसाद - अमृताच्या लव्हस्टोरीची सुरुवात

प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे बिग बॉस मराठी 4 मध्ये सहभागी होते. या शोमध्ये प्रसाद - अमृतामध्ये चांगली मैत्री झाली. दोघांमध्ये अनेक वाद - विवादही झाले. शोनंतर मात्र दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. आणि अचानक दोघांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अखेर आज प्रसाद - अमृताने एकमेकांशी लग्न करुन सहजीवनाची सुरुवात केलीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT