Prasad Jawade - Amruta Deshmukh, prasad jawade recite special romantic poem to amruta deshmukh Esakal
मनोरंजन

Prasad Jawade- Amruta Deshmukh: प्रसाद जवादे अन् अमृता देशमुखने उरकला साखरपूडा! लग्नाची तारीखही ठरली..

Vaishali Patil

Prasad Jawade- Amruta Deshmukh Engaged: बिग बॉस मराठी ४ नंतर प्रसाद जवादे चर्चेत आहे. प्रसाद आणि अमृता देशमुख यांच्या रिलेशनशिपची सध्या चर्चा होती .आता त्यातच दोघांनीही त्याच्या रिलेशनशिपबद्दल चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे.

प्रसादच्या फॅन्ससाठी मोठी खुशखबर आहे. त्याने याबाबत पोस्ट शेयर करत सांगतिले की, ते लवकरच लग्न करणार आहेत. त्यांनी रोमँटिक फोटो शेयर केले आहेत. या फोटोत दोघेही त्यांची अंगठी फ्लाँट करतांना दिसत आहे.

(Prasad Jawade - Amruta Deshmukh Engagement)

नुकतिच दोघांनी फोटो शेयर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलयं की, 'आमचा साखरपुडा झाला आहे, आम्ही अधिकृतपणे कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना नॉमिनेट करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही टास्कला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. असं हटके कॅप्शन त्यांने या फोटोला दिलं आहे.

या पोस्टसोबत त्यांनी त्याच्या लग्नाची तारीखही प्रेक्षकांसोबत शेयर केली आहे. हे दोघं येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.

प्रसाद - अमृता बिग बॉस नंतर एकमेकांसोबत भटकंती करताना, इव्हेंटमध्ये एकत्र जाताना दिसतात. त्याच्या चाहत्यांना ही जोडी खुप आवडते. प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांची भांडण - मिश्किल मैत्री बिग बॉस मराठी ४ च्या घरात पाहिली. प्रसाद आणि अमृता यांची मैत्री वाढली ती बिग बॉस मराठी ४ संपल्यावर कायम होती.

हे दोघे एकमेकांसोबत छान वेळ घालवतात. काही दिवसांपूर्वी या दोघांनी मुंबईत आलेल्या बॅकस्ट्रीट बॉईजच्या कॉन्सर्टला भेट दिली. तिथे या दोघांचा रोमँटिक अंदाजात दिसायचे. कलर्स मराठीवर काव्यांजली - सखी सावली या मालिकेत प्रसाद जवादे झळकत आहे. आता ही गोड बातमी दिल्यानंतर त्याचे चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT