prasad jawade and amruta deshmukh dance together for Bigg Boss Marathi 4 finale  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: फिनालेच्या पूर्वतयारी दरम्यान प्रसाद- अमृता झाले रोमँटिक..

फिनालेसाथी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख थिरकणार लव्ह साँगवर..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi: ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आता अगदी जवळ आला आहे. गेली 98 दिवस आपण बिग बॉस मराठीचा खेळ पाहत आहोत. अवघ्या दोन दिवस या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. त्या क्षणाची उत्सुकता आता चांगलीच वाढली आहे. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात ही ट्रॉफी विजेत्याला दिली जाणार आहे. रविवारी होणाऱ्या या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून बिग बॉस मराठीच्या खेळातून बाहेर पडलेले स्पर्धकही कसून तयारी करत आहे. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

(prasad jawade and amruta deshmukh dance together for Bigg Boss Marathi 4 finale )

बिग बॉस मराठी ४ चं पर्व आता संपत आलं आहे. येत्या रविवारी ८ जानेवारी रोजी बिग बॉसचा फिनाले आहे. या सोहळ्याला आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. सोळा स्पर्धकांसोबत सुरु झालेला हा प्रवास टॉप पाच स्पर्धकांवर आला आहे. त्यामुळे या पर्वात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सोहळ्यासाठी बिग बॉस मधून बाहेर पडलेले सदस्य देखील जोरदार तयारी करत आहे. या सर्व सदस्यांचा डान्स ही असणार आहे. पण यामध्ये लक्ष वेधून घेणार आहे ती प्रसाद जवादे आणि अमृताची जोडी. ही दोघेही या सोहळ्यात एकत्र रोमॅंटिक गाण्यावर ताल धरणार आहेत.

नुकताच त्या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघेही बिग बॉस मराठीच्या फिनाले ची तयारी करत आहे. दोघेही हातात हात धरून रोमॅंटिक पोज देत एका गाण्यावर नाचतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे बिग बॉस च्या घरातली ही केमिस्ट्री आता ऑन स्टेज ही पाहायला मिळणार आहे. शिवाय त्यांच्यात बहरलेले मैत्रीचे नाते आता किती पुढे जाते आहे, याकडेही त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT