prasad jawade eliminated Bigg Boss Marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: शेवटचं एलिमिनेशन अन् प्रसाद जवादे घराबाहेर..

सतत वादात अडकणारा अभिनेता प्रसाद जवादे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर..

नीलेश अडसूळ

‘बिग बॉस मराठी’चा १०० दिवसांचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस च्या खेळाचा विजेता ठरण्यासाठी अवघे ७ दिवस बाकी आहेत. अशा या महत्वाच्या टप्प्यावर बिग बॉसच्या घरातील शेवटचे एलिमिनेशन पार पडले, यावेळी ९३ दिवसांचा टप्पा पार परत अभिनेता प्रसाद जवादे बिग बॉसच्या घराबाहेर पडला.

(prasad jawade eliminated Bigg Boss Marathi 4)

गेल्या आठवड्यात अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य घरामध्ये होते. यामध्ये अपूर्वा तिकीट टू फिनाले टास्क जिंकून शेवटच्या आठवड्यात गेली तर राखी, प्रसाद आणि अमृता नॉमिनेट झाले. त्यातून काल प्रसाद जवादेची बिग बॉसमधून एग्झिट झाली.

गेली काही दिवस सर्वच सदस्य प्रसादला नॉमिनेट करत होते. त्याच्या वागण्यावर, खेळावर सगळेच स्पर्धक नाराज होते. किंबहुना ,मला या घराबाहेर जायचं आहे, असं प्रसाद अनेकदा म्हणाला होता. पण शेवटच्या काही दिवसात त्याचा खेळ बराच सुधारला. त्या आठवड्यात तर मांजरेकरांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले. पण दुर्दैवाने तो एलिमिनेट झाला आणि त्याला घराबाहेर जावे लागले.

घराबाहेर पडताना प्रसादचे डोळे पाणावले. तर “आपली जी भांडणं आहेत ती आपण याच घरापुरती ठेवूया,” असं म्हणत प्रसादने सर्वांची माफी मागितली. यावेळी सगळ्या स्पर्धकांनी भावूक होत प्रसादला निरोप दिला. आता अवघ्या काही दिवसात या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. त्यामुळे ही पर्व कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

SCROLL FOR NEXT