prasad oak : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. त्याचा 'धर्मवीर'चा सर्व प्रवास आता 'माझा आनंद' या पुस्तकातूनही समोर आला आहे. लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे. अशा प्रकाशझोतात असतानाच प्रसादने अभिनेता जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी' चित्रपटासाठी एक खास पोस्ट केली आहे.
(Prasad Oak shared post for godavari marathi movie and jitendra joshi)
मराठी मनोरंजन विश्वात सध्या 'गोदावरी' चित्रपटाची बरीच चर्चा आहे. निखिल महाजन दिग्दर्शित, जितेंद्र जोशी याची मुख्य भूमिका असेलला 'गोदावरी' हा चित्रपट आज 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर अनेक नामांकीत सोहळ्यात यश मिळवलेला हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला. या प्रीमियरला अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकनं हजेरी लावली होती. हा चित्रपट पाहून तो भारावून गेला आहे.
सध्या मराठी मनोरंजन विश्वात ऐतिहासिक चित्रपटावरुन चांगलाच गदारोळ सुरू आहे. 'हर हर महादेव' चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आल्याने वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मराठी चित्रपटाभोवती एक गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. अशातच 'गोदावरी' प्रदर्शित होणार असल्याने प्रसादने ही पोस्ट लिहिली आहे.
प्रसाद म्हणतो, ''लेखकाला जे कागदावर म्हणायचंय ते आणि दिग्दर्शकाला जे पडद्यावर म्हणायचंय ते जेव्हा संपूर्ण टीम ला 100 % कळलेलं असतं तेव्हा #गोदावरी सारखा चित्रपट निर्माण होतो..!! सध्याच्या गढूळ वातावरणात जर मराठी चित्रपटाचं "पावित्र्य" म्हणजे काय ते जाणून घ्यायचं असेल तर "गोदावरी" पहायलाच हवा.''
पुढे तो म्हणतो, 'प्राजक्त चं नितांत नितळ लेखन. निखिल चं तितकंच तरल दिग्दर्शन. सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय. विक्रम काकांबद्दल मी काय बोलू?? ते "बाप" आहेत आणि कायमच रहाणार. मोने आणि नीनाताई अप्रतिम. प्रियदर्शन आणि मोहित टाकळकर लाजवाब. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो गौरीचा आणि आमच्या जित्याचा. कॅमेऱ्यासमोरची सहजता म्हणजे काय, सट्ल अभिनय म्हणजे काय ते गौरीनी आणि भूमिका उमजून काम करणं म्हणजे काय, इंटेन्स अभिनय म्हणजे काय ते जित्यानी क्षणोक्षणी सिद्ध केलंय.
''ए व्ही प्रफुलचंद्र चं नकळतपणे येणारं पार्श्वसंगीत हि या चित्रपटाची अत्यंत महत्वाची बाजू. संकलनामुळे चित्रपटाला आलेला "ठेहेराव" खूप मोलाचा आहे. "समृद्ध" मराठी चित्रपट म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर "गोदावरी" नक्की पहा. उद्यापासूनच सर्वत्र प्रदर्शित होतोय. संपूर्ण टीम ला मनःपूर्वक शुभेच्छा...!!!'' अशी पोस्ट त्याने केली आहे. त्याच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.