prasad oak special birthday wishes to marathi actress amruta khanvilkar SAKAL
मनोरंजन

Amruta Khanvilkar: मुद्दाम मी आज... प्रसादने लाडक्या 'चंद्रमुखी'ला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

प्रसादने अमृताला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात

Devendra Jadhav

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने आजवर मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली. अमृताचा आज वाढदिवस. अमृताचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अशातच अभिनेता - दिग्दर्शक प्रसाद ओकने अमृताला वाढदिवसाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसानिमित्त प्रसाद - अमृताला काय म्हणाला? बघा.

(prasad oak special birthday wishes to actress amruta khanvilkar)

प्रसादने खास अंदाजात दिल्या अमृताला शुभेच्छा

प्रसादने अमृता खानविलकरसोबत काही महिन्यांपुर्वी चंद्रमुखी सिनेमा बनवला. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसादने केलं होतं. तर अमृताने सिनेमात चंद्रमुखीची प्रमुख भूमिका साकारली. या सिनेमातली गाणी आणि सिनेमासुद्धा सुपरहिट झाला.

आज अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्यात. प्रसाद लिहीतो, प्रिय अमृता… असे क्षण तुझ्या आयुष्यात वारंवार येवोत… ( म्हणून मुद्दाम हा तुझा आवडता फोटो टाकतोय ) कायम अशीच प्रसन्न, हसतमुख रहा…!!! तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा. देव पूर्ण करो हीच प्रार्थना…!!! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…!!! खूप खूप खूप प्रेम…!!!

प्रसाद - अमृता झळकणार एकाच सिनेमात

प्रसादने दिलेल्या वाढदिवसांच्या शुभेच्छांवर अमृतानेही खास प्रतिक्रिया दिलीय. प्रसाद खुप धन्यवाद. तू माझ्यासाठी खुप स्पेशल आहेस. Thank You For Everything.

प्रसाद आणि अमृता आगामी सिनेमात एकत्र झळकणार आहेत. हा सिनेमा म्हणजे पठ्ठे बापूराव. शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र 'पठ्ठे बापूराव' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे.

या चित्रपटात अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सोशल मीडियावर करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Darshan: भीमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा; भाविकांच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर, दर्शनासाठी येणार असाल तर ही बातमी वाचा!

Powai Lake: मुंबईकरांची धडधड वाढली! तलावातून 7 फूट मगर बाहेर आली; नागरिकांची धावपळ, वन विभागाने अनर्थ टाळला

Latest Marathi News Update : मिसिंग लिंकवर दरड कोसळली, दरड आम्ही आणली नव्हती : बावनकुळे

Ajinkya Rahane: 'वर्ल्ड कपचा हिरो अन् संघाबाहेर?' संजू सॅमसनच्या निवडीवर रहाणेचा थेट सवाल; BCCI ला सुनावलं?

Ethanol Petrol Issues : पावसाळ्यात तुमचीही दुचाकी अचानक बंद पडतेय? पेट्रोलमधील 'या' गोष्टीमुळे वाढली वाहनचालकांची डोकेदुखी; कशी घ्यावी खबरदारी?

SCROLL FOR NEXT