बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने शिवसैनिक आक्रमक, शिवसेना भवनासमोर ठाकरेसेनेचं आंदोलन; शायना एनसींची पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी

Thackeray Shivsena Protest: बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या प्रकारामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाकरेसेनेने शिवसेना भवनासमोर आंदोलन करत शायना एनसी यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी केली.
Thackeray Shivsena Protest

Thackeray Shivsena Protest

ESakal

Updated on: 

मुंबई : शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या शायना एनसी यांच्याकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मणिशंकर अय्यर यांचे एकत्रित छायाचित्र फाडल्याच्या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटले आहे. बुधवार (ता. १८) रोजी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत सभा तहकूब करण्याची मागणी केल्यानंतर आज याप्रकरणी शिवसेना भवनासमोर ठाकरेसेनेकडून आंदोलन केलं जात आहे.

Loading content, please wait...