Prasad Vedpathak Tweet: viral news
मनोरंजन

Prasad Vedpathak Tweet: 'मी एकवेळ माफ करेन पण बायकोच्या नादी लागू नका'

प्रसिका या नावानं सोशल मीडियावर नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दीपिका आणि प्रसाद वेदपाठकच्या ट्विटनं खळबळ उडवून दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prasad Vedpathak News: प्रसिका या नावानं सोशल मीडियावर नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दीपिका आणि प्रसाद वेदपाठकच्या ट्विटनं खळबळ उडवून दिली आहे. काल दीपिकानं केलेल्या ट्विटमधून आपली सणसणीत प्रतिक्रिया दिली होती.

त्यातून तिनं आपल्या पतीला कुणी काही बोलल्यास सहन करणार नाही. अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता दीपिकाच्या पतीची प्रसादच्या त्या व्टिटनं वेगळाच माहौल तयार केला आहे. त्यामध्ये त्यानं एकवेळ मी माफ करेल पण माझ्या बायकोच्या नादी काही लागू नका. असे म्हटले आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये हॅशटॅग लैला असं लिहिलं आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे आहे हे नेटकऱ्यांनी ताडले आहे.

प्रसाद आपल्या व्हायरल झालेल्या त्या ट्विटमध्ये म्हणतो की, मी एकवेळ माफ करेन पण बायकोच्या नादी अजिबात लागू नका. ३ वर्ष मंत्रालयात काम केलेली बाई आहे ती मी कोथळा काढण्याआधी तीच तुमचा कार्यक्रम करेल. प्रसिकानं ट्विट करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तिनं त्या ट्विटमध्ये म्हटले होते की, अनेकांनी माझ्या पतीला बदनाम करण्याचा आणि अपमानित केले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं मला पैसे कमविण्यासाठी सांगितलं म्हणून.

ज्यांनी कुणी आम्हाला ट्रोल केले आहे त्यासर्व कार्यकर्त्यांना मला सांगायचे आहे की, आम्ही बिझनेस पार्टनर्स आहोत. नवरा बायको होण्यापूर्वी शाळेतली मित्रही. आम्ही दोघांनी मिळून आमचं विश्व तयार केलं आहे. तेव्हा आमच्यावर जळु नका. आमच्याशी हवं तर बरोबरी करण्याचा प्रयत्न करा. असं प्रसिकानं म्हटलं होतं.

त्यानंतर आता प्रसादच्या ट्विटनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात तो म्हणतो, बायकोच्या नादी अजिबात लागू नका. प्रसादच्या त्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी देखील प्रसादला आपला पाठींबा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसिका हे इन्फ्ल्युंएसर कपल वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. प्रसादला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या दीपिकानं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT