prashant damle uddhav thackeray 
मनोरंजन

मोगॅम्बो खुश हुआ! अभिनंदन करताना प्रशांत दामलेंचा ठाकरे सरकारला टोला

दुकाने, उपहारगृहे आणि मॉल्स रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी तर धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे मात्र बंदच

स्वाती वेमूल

राज्यात १५ ऑगस्टपासून निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. दुकाने, उपहारगृहे आणि मॉल्स आठवड्याचे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे मात्र बंदच राहणार आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर अभिनेते प्रशांत दामले Prashant Damle यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी ठाकरे सरकारला Maharashtra Govt उपरोधिक टोला लगावला आहे.

प्रशांत दामलेंची पोस्ट-

'राज्यातील हॉटेल्स मालकांचे, रेस्टॉरंट मालकांचे, जिम मालकांचे, मॉल्स मालकांचे हार्दिक अभिनंदन. मोगॅम्बो खुश हुवा! म्हणजे आता हळूहळू नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा (अनावश्यक) टप्पा लवकरच येईल, अशी आशा बाळगू या. आता काळजी घ्यायलाच हवी. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार' अशी पोस्ट लिहित प्रशांत दामलेंनी सरकारला उपरोधिक टोला लगावला.

'फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच कोरोना आहे का?'; उमेश कामतचा सवाल

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यात निर्बंध शिथिल करण्यासाठी जनमताचा रेटा वाढला होता. अखेर रेल्वे, दुकाने, उपहारगृहे, मॉल्स सुरू करून राज्यातील सामान्य जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला. असं असलं तरी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांच्याबाबत निर्णय न घेतल्याने अनेक कलाकार नाराज झाले आहेत. 'फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच कोरोना आहे का?', असा सवाल अभिनेता उमेश कामतने केला होता. "आजूबाजूला पाहिल्यास सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत, फक्त नाटक इंडस्ट्री थांबली आहे. फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच कोरोना आहे का", असं तो म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT