Prathamesh laghate and Mugdha vaishampayan halad photo viral on social media SAKAL
मनोरंजन

Prathamesh - Mugdha Wedding Updates: पारंपरिक थाटात झाला प्रथमेश - मुग्धाचा हळदी समारंभ, फोटो व्हायरल

पारंपरिक थाटात लागली प्रथमेश - मुग्धाला हळद

Devendra Jadhav

Prathamesh - Mugdha Wedding Updates: 'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' फेम गायक जोडी प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाची धामधूम सध्या सुरु आहे. हे दोघं गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. लग्नसमारंभाचे विविध फोटो हे दोघे सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अशातच प्रथमेश - मुग्धाच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या दोघांनी अस्सल पारंपरिक थाटात हळदी समारंभ केलाय.

प्रथमेश - मुग्धाला लागली हळद

प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. "हरिद्रा लापन । मांगलिक स्नान" असं कॅप्शन देत प्रथमेशने फोटो शेअर केलेत. तर "हरिद्रा लापन । घाणा भरणे", असं कॅप्शन देत मुग्धाने हळदीचे फोटो शेअर केलेत.

प्रथमेश - मुग्धा या दोघांच्या हळदीच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. दोघांनी पारंपरिक थाटात हळदीचा समारंभ साजरा केल्याने लोकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

प्रथमेश - मुग्धा यांनी गुपचुप उरकला साखरपुडा

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काल रात्री खास फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

वाङ्निश्चय असं कॅप्शन देऊन प्रथमेश - मुग्धाने फोटो शेअर केलेत. हे फोटो बघताच या दोघांनी गुपचुप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

प्रथमेश - मुग्धाच्या लग्नाची उत्सुकता

15 जून रोजी दोघांनी पोस्ट शेयर करत त्यांच्या नात्याविषयी चाहत्यांना सांगितलं होतं. आमचं ठरलंय असं कॅप्शन देत त्यांनी त्यांच्या रिलेशनशीपचा खुलासा केला.

या व्हिडिओनंतर हे तर स्पष्ट झालंय की, दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. दोघांच्या लग्नाची तारिखही लवकरच चाहत्यांना कळेल. त्यामुळे दोघांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला हप्ता अखेर वितरीत, नवीन कर्ज लगेच मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं!

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

Abhijeet Dipke: सरकारची अमेरिकन कंपनीच्या मदतीने दिपकेवर पाळत? वैयक्तिक माहिती प्रदर्शित केली?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

Palghar News: पोषण आहाराला कात्री, डहाणूतील ३५ आश्रमशाळांमध्ये चपातीचा पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT