prathamesh laghate and mugdha vaishampayan wedding photos and video viral  SAKAL
मनोरंजन

Prathamesh - Mugdha Wedding: विवाहसंपन्न! थाटामाटात पार पडलं प्रथमेश - मुग्धाचं लग्न, व्हिडीओ व्हायरल

प्रथमेश - मुग्धाच्या लग्नाचे फोटो - व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेत

Devendra Jadhav

Prathamesh Laghate - Mugdha Vaishampayan Wedding: प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता होती. अखेर प्रथमेश - मुग्धाने आज थाटामाटात एकमेकांशी लग्न केलंय.

नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत प्रथमेश - मुग्धाने एकमेकांशी लग्न केलंय. या दोघांच्या लग्नाचे फोटो - व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले आहेत.

प्रथमेश - मुग्धाचं थाटामाटात लग्न संपन्न

प्रथमेश - मुग्धाने एकमेकांसोबत थाटामाटात लग्न केलं. सूत्रांच्या माहितीनुसार चिपळुणमध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. प्रथमेश चिपळूण, रत्नागिरीला राहणारा असून त्याच्या गावी हे लग्न झाल्याचं बोललं जात आहे.

प्रथमेशने लग्नाच्यावेळी लाल रंगाचा कुर्ता, खांद्यावर उपरणं तर डोक्यावर पगडी घातली होती. तर मुग्धाने पिवळ्या - हिरव्या रंगाची शेड असलेली साडी नेसली होती.

प्रथमेश - मुग्धाला लागली हळद

प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन या दोघांनी काल त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हळदीचे फोटो शेअर केले होते. "हरिद्रा लापन । मांगलिक स्नान" असं कॅप्शन देत प्रथमेशने फोटो शेअर केलेत. तर "हरिद्रा लापन । घाणा भरणे", असं कॅप्शन देत मुग्धाने हळदीचे फोटो शेअर केलेत.

प्रथमेश - मुग्धा या दोघांच्या हळदीच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. दोघांनी पारंपरिक थाटात हळदीचा समारंभ साजरा केल्याने लोकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

प्रथमेश - मुग्धा यांनी गुपचुप उरकलेला साखरपुडा

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करुन साखरपुड्याची घोषणा केली होती.

'वाङ्निश्चय' असं कॅप्शन देऊन प्रथमेश - मुग्धाने फोटो शेअर केलेत. हे फोटो बघताच या दोघांनी गुपचुप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Health : अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली; पत्रकारांशी संवादाआधीच उलटी, डॉक्टरांकडून घरी तपासणी

मंत्र्यांसमोरच ऑपरेटरने मागितली ५० हजाराची लाच, अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभागातील धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय घडामोडींना वेग

Mumbai High Court: दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही अनुकंपा नोकरीचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

SCROLL FOR NEXT