prathamesh parab and kshitija ghosalkar esakal
मनोरंजन

Prathamesh Parab: दगडूला प्राजू मिळाली! थाटात पार पडला प्रथमेश आणि क्षितिजा यांचा विवाह सोहळा, पहा Exclusive Video

Prathamesh Parab: सध्या प्रथमेश आणि क्षितिजा यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

priyanka kulkarni

Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि क्षितिजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या प्रथमेश आणि क्षितिजा यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

प्रथमेश आणि क्षितिजा यांचा खास लूक

प्रथमेश आणि क्षितिजा यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता. क्षितिजानं गुलाबी रंगाची साडी आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक केला होता. तर प्रथमेशनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि फेटा असा लूक केला होता. दोघांच्या या खास लूकचं सध्या अनेकजण कौतुक करत आहेत. प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या विवाह सोहळ्याला रवी जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांनी हजेरी लावली होती.

शेअर केले फोटो

प्रथमेश आणि क्षितिजा यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,"Finally......Lockdown love story चे Hearts,
forever साठी locked" प्रथमेश आणि क्षितिजा यांनी शेअर केलेल्या लग्नसोहळ्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

प्रथमेश आणि क्षितिजा यांनी लग्नाआधी खास प्रीवेडिंग फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटच्या फोटोमध्ये प्रथमेश आणि क्षितिजा यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळाला.

'टाईमपास' मुळे मिळाली लोकप्रियता

प्रथमेश परबला टाईमपास या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यानं दगडू परब ही भूमिका साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

प्रथमेशचा डिलिव्हरी बॉय हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. मोहसीन खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बालक-पालक,उर्फी,लालबागची राणी, टकाटक 2 या चित्रपटांमध्ये प्रथमेशनं काम केलं आहे. तसेच प्रथमेशनं दृष्यम या हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे. प्रथमेशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT