Prathamesh Parab 
मनोरंजन

Prathamesh Parab: दगडूचा रोमँटिक अंदाज; साखरपुड्यात किंग खानच्या गाण्यावर थिरकला प्रथमेश परब, पाहा व्हिडीओ

Prathamesh Parab: नुकताच प्रथमेशनं त्याच्या साखरपुड्यातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Prathamesh Parab: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि क्षितिजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या दोघांच्या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच प्रथमेशनं त्याच्या साखरपुड्यातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

प्रथमेशचा रोमँटिक अंदाज

प्रथमेशनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या साखरपुड्याच्या व्हिडीओमध्ये तो रंग दे तू मोहे गेरुआ या शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओला प्रथमेशनं कॅप्शन दिलं, "क्योंकि रियल लाइफ में भी थोड़ा फिल्मी होना जरूरी है" या व्हिडीओमधील प्रथमेशच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पाहा व्हिडीओ:

प्रथमेश आणि क्षितिजा यांचा लूक

प्रथमेश आणि क्षितिजा यांनी साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. प्रथमेशनं पिंक करलरचा आऊटफिट परिधान केला होता तर क्षितिजानं पिंक कलरचा वनपीस घातला होता.

प्रथमेशचे चित्रपट

प्रथमेशचा डिलिव्हरी बॉय हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. पृथ्वीक प्रताप,अंकिता लांडे-पाटील यांनी देखील या चित्रपटात भूमिका साकारली. मोहसीन खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. टाइमपास या चित्रपटामुळे प्रथमेशला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात प्रथमेशनं दगडू ही भूमिका साकारली. बालक-पालक,उर्फी,लालबागची राणी, टकाटक 2 या चित्रपटांमध्ये प्रथमेशनं काम केलं आहे. तसेच प्रथमेशनं दृष्यम या हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT