Prathamesh Parab esakal
मनोरंजन

Prathamesh Parab: 'गुरुवारपर्यत कळ काढा!' असं म्हणत दगडुनं दिली लग्नाची बातमी

हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से आमीर है....टाईमपासमध्ये दगडु अर्थात प्रथमेश परब हा भलताच लोकप्रिय झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

Prathamesh Parab News: वर्षाच्या सरतेशेवटी मराठीतील आणखी एक प्रसिद्ध सेलिब्रेटी हे विवाहबंधनात अडकणार असल्याचे दिसून येत आहे. बॉलीवूड पाठोपाठ मराठी सेलिब्रेटी देखील यंदाच्या वर्षात मोठ्या उत्साहात, आनंदात वेडिंग सेलिब्रेशन करताना दिसत आहे. आता मराठी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्यानं दिलेली गुड न्युज नेटकऱ्यांसाठी आनंदाची ठरली आहे.

हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से आमीर है....टाईमपासमध्ये दगडु अर्थात प्रथमेश परब हा भलताच लोकप्रिय झाला होता. काहीही झालं तरी प्राजक्ताशी लग्न करायचचं अशा इराद्यानं तिच्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या प्रथमेशनं आता एक गोड बातमी दिली आहे. ती बातमी त्यानं सोशल मीडियातून व्हायरल केली आहे. तो आता लग्न करायचं म्हणतोय. लग्नाची पत्रिकाही त्यानं शेयर केली आहे. पण गुरुवारपर्यत कळ काढा....असेही त्यानं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वातील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्याला नेटकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसादही मोठा होता. प्रथमेशनं त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो नवरदेव झाला आहे. शेरवानी परिधान करत डोक्याला मुंडावळ्या बांधत हातात हार घेऊन प्रथमेश फोटोत उभा आहे. त्याने लग्नाचं थेट आमंत्रणही दिलंय.

प्रथमेश लग्न करणार असल्याचे वाचून आणि ऐकून त्याच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. त्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. “सगळे विचारत आहेत…विचार केला सांगूनच टाकू…गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा!”, असं म्हणत प्रथमेशने तो फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी केलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT