anibani, anibani movie news, pravin tarde, upendra limaye, sanjay khapre, arvind jagtap
anibani, anibani movie news, pravin tarde, upendra limaye, sanjay khapre, arvind jagtap SAKAL
मनोरंजन

Anibani Movie: 'आणीबाणी' पुन्हा लागणार.. पण यंदा सिनेमागृहात.. प्रवीण तरडेंचा नवीन सिनेमा

Devendra Jadhav

Anibani Movie News: 'आणीबाणी' हा शब्द जरी उच्चारला तरी सर्वसामान्य जनतेची चिंता वाढते. सामान्य लोकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी गोष्ट म्हणजे आणीबाणी. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे.

लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी विनोदाची ही ‘आणीबाणी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे.

(pravin tarde new marathi movie anibani, written by arvind jagtap relased in jun 2023)

उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील अनेक दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग आहे.

राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी वेगवेगळे मुद्दे चित्रपटातून आजवर मांडले आहेत.

आता आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर नवरा बायकोच्या नात्याची हलकीफुलकी गोष्ट ते घेऊन आले आहेत. ही ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या आणीबाणीतून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा यात मांडण्यात आली आहे.

दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप मनोरंजनाची मिसळ आपल्याला चाखायला देणार आहेत.

मनोरंजनाची ही मिसळ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास दिनेश जगताप व्यक्त करतात.

Pravin Tarade's Latest Movie

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे.

देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत,पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे.

पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय,..किरण कोट्टा आणि मिक्स,.. नागेश राव चौधरी यांनी केले आहे.

छायांकन मंगेश गाडेकर यांनी केले असून या संकलन प्रमोद कहार यांचे आहे. 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट येत्या जून २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT