pravin tarde wife snehal angry reaction on baloch movie Khulya Jivala Aas Khuli romantic song with smita gondkar
pravin tarde wife snehal angry reaction on baloch movie Khulya Jivala Aas Khuli romantic song with smita gondkar  sakal
मनोरंजन

Pravin Tarde: स्मिता गोंदकर सोबत रोमँटिक झालेलं पाहून प्रवीण तरडेंची बायको नाराज.. म्हणाली; माझ्यासोबत..

नीलेश अडसूळ

snehal tarde on pravin tarde song with smita gondkar: लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशी बहू ख्याती असलेले प्रवीण तरडे म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे.

'मुळशी पॅटर्न' असो 'धर्मवीर' किंवा 'हंबीरराव' प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. विशेष म्हणजे आपली संस्कृती, परंपरा याविषयी ते भरभरून बोलत असतात. अवघ्या काही दिवसातच त्यांचा 'बलोच' हा मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट येत आहे.

या चित्रपटातील 'आस खुळी' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात प्रवीण तरडे पहिल्यांदाच रोमॅंटिक अंदाजात दिसले आहेत. या गाण्यात त्यांचे आणि स्मिता गोंदकरचे रोमॅंटिक सीन आहेत. पण त्यावर प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल मात्र चांगल्याच नाराज झाल्या आहेत.

(pravin tarde wife snehal angry reaction on baloch movie Khulya Jivala Aas Khuli romantic song with smita gondkar )

नुकत्याच एका मुलाखतीत प्रवीण तरडे या गण्याविषयी बोलले. त्यावेळी या गाण्यावर प्रवीण पत्नीची प्रतिक्रिया काय होती, हेही सांगितले. ते म्हणाले, 'मला यात रोमँटिक भूमिका का करायला दिली आहे, हाच प्रश्न पडलाय. रोमँटिकपणा हे माझ्यात कुठेच नाही. पण माझं हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर बायकोला खूप मोठा धक्का बसला आहे.'

''स्नेहलने हे गाणं पूर्ण पाहिलंच नाही. ती मला म्हणाली.. मी ते गाणं पाहणार नाही.' त्यावर मी तिला म्हटलं की, 'अगं तो चित्रपट आहे. तू पण अभिनेत्री आहे. त्यामुळे तुला ते सर्व माहिती आहे.' त्यावर ती म्हणाली, 'हंबीरराव चित्रपटात मी तुझी नायिका होते. तेव्हा तू असं रोमँटिक गाणं का केलं नाही?'

पुढे ते म्हणाले, 'आता 'मी तिला कसंबसं समजावलं आहे. पण तिचा राग मात्र गेलेला नाही. ते गाणं फार सुंदर झालं आहे. पण माझी बायको सोडून ते संपूर्ण जगाने पाहिलंय.'

पण हा सीन करताना प्रवीण तरडेंची अवस्था काय होती, त्यावरही ते बोलले. प्रवीण म्हणाले, 'त्यात रोमँटिक प्रवीण तरडे दिसलाय, हे पाहून मलाच आश्चर्य वाटलंय. इतर वेळी माझा कॉन्फिडन्स असतो तो दिसतो. पण तिकडे मी घाबरत घाबरत स्मिताच्या गालावरुन हात फिरवला आहे. ते रोमँटिक गाणं करताना माझ्या नाकी नऊ आले होते. पण ते आता कसं बसं झालंय.' मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT