Preity Zinta  sakal
मनोरंजन

Preity Zinta's clarification on name: "अरे बाबा माझं नाव..." प्रितीला अचनाक काय झालं? व्हिडिओ व्हायरल

प्रिती झिंटाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल!

Vaishali Patil

Preity Zinta Video: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा हिला काही वेगळी ओळख देण्याची गरज नाही. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहे. तिला सर्वजण ओळखतात. प्रिती ही आयपीएल टीम पंजाब किंग्सची सह-मालक आहे.

आज जरी प्रिती इंडस्ट्रीपासून दूर असली, पण तिच्या फॅन फॉलोइंगवर याचा फारसा परिणाम झालेला नाही. ती सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहते. मात्र आता प्रितीने एक व्हिडिओ शेयर करत तिच्या नावाचे स्पष्टीकरण दिले आहे. आता इतक्या वर्षानंतर प्रितीने आपल्या नावाबाबत सांगून अनेकांचा गैरसमज दुर केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटवर प्रातीचे नाव 'प्रीतम सिंह झिंटा' असल्याचे सांगितले जात आहे, ज्याबद्दल स्वत: प्रातीनेच स्पष्टीकरण दिले आणि तिचे खरे नाव काय आहे हे सांगितले आहे.

प्रिती झिंटाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रीती म्हणते की 'हॅलो, मी हे स्पष्टिकरण देत आहे कारण इंटरनेटवर, गुगलवर, विकिपीडियावर सर्वत्र असं लिहिलं आहे की माझं नाव 'प्रीती झिंटा' ठेवण्यात आलं आहे, यापुर्वी माझं नाव 'प्रीतम सिंह' झिंटा' होतं.'

आज जेव्हा मी एका बातमीत वाचलं की माझे खरं नाव प्रीतम सिंग झिंटा आहे, तेव्हा मी स्वत:ला रोखू शकली नाही. मी तुम्हाला सांगते की ही फक्त एक अफवा आहे. माझं नाव 'प्रीतम सिंग झिंटा' कधीच नव्हतं. जन्मापासूनच माझं नाव प्रीती झिंटा होतं. लग्नानंतर मी प्रीती जी झिंटा झाली आहे. मी माझ्या पतीच्या नावाचं 'g' जोडलं आहे. तर माझे नाव आता प्रीती जी झिंटा आहे.

यात तिने लिहिले की, 'खरं असं आहे की आमच्या 'सोल्जर' चित्रपटाच्या सेटवर बॉबी देओल मला विनोदाने प्रीतम सिंह म्हणायचा. हा चित्रपट हिट झाला, आमची मैत्री घट्ट झाली आणि हे नाव मला इतकं चिकटलं की आताही मला सोडत नाहीये.

सध्या प्रितीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 'दिल से' या चित्रपटातून प्रीतीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1998 मध्ये केली होती. त्यात शाहरुख खानही होता.आता ती चित्रपटापासून लांब आहे. ती आपली दोन मुलं आणि पतीसोबच परदेशात राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 270 अंकांनी वाढला; शेवटच्या तासात बाजाराने घेतला यू-टर्न, काय आहे कारण?

'चला हवा येऊ द्या २' मध्ये भाऊ कदम का नाही? प्रेक्षक नाराज; अखेर खरं कारण समोर

Pakistani Boat Raigad : रायगडच्या समुद्रात पाकिस्तानी संशयित बोट, गुप्तचर विभागाला मॅसेज; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक

Shocking News: नवरदेव आणि वऱ्हाडींना मंडपातच बेदम चोपले, हॉस्पिटलमध्येच लावाले लागले लग्न, तिथूनच नवरीची पाठवणी; नेमकं काय घडलं?

IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्स जिंकायची तयारी...! टीम इंडियाची जबरदस्त रणनीती; जसप्रीत बुमराह आला आहेच, शिवाय...

SCROLL FOR NEXT