Rhea Chakraborty  sakal
मनोरंजन

Roadies 19: 'हिच्या सोबत काम करणार नाही', रिया चक्रवर्तीसोबत काम करण्यास प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटीचा नकार

बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती 'रोडीज 19' द्वारे 3 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे.

Aishwarya Musale

एमटीव्ही शो 'रोडीज'चा 19 वा सीझन लवकरच एका नवीन थीमसह प्रीमियर होणार आहे. यावेळची थीम असेल- कर्म किंवा कांड. या शोमध्ये आता प्रिन्स नरुला, गौतम गुलाटी आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह तीन नवीन गँग लीडर असतील.

त्याचबरोबर सोनू सूद देखील या शोचा महत्त्वाचा भाग असणार आहे. एकीकडे लोक 'रोडीज'च्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे एक बातमी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

रिया चक्रवर्ती 3 वर्षांनंतर शोबिझमध्ये कमबॅक करत आहे. शोमध्ये ती गँग लीडर बनली आहे. एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला मोठ्या ट्रोलचा सामना करावा लागला होता.

अशा परिस्थितीत जेव्हापासून लोकांना समजले की रिया चक्रवर्ती 'रोडीज 19' मध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे, तेव्हापासून ते सोशल मीडियावर आपला राग काढत आहेत. यासोबतच ते रोडीज पाहणार नसल्याचेही सांगत आहेत. दरम्यान, तिचे को-गॅंग लीडर्सचे देखील हेच म्हणणे आहे.

ट्रोल झाल्यानंतर प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांनीही रिया चक्रवर्तीसोबत काम करण्यास नकार दिल्याची बातमी समोर येत आहे. सेटवर प्रिन्स आणि गौतमसोबत रियाचे जोरदार युद्ध सुरू असल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, रियाचा प्रोमो रिलीज झाल्यापासून प्रिन्स आणि गौतमचा देखील लोकांना राग येत आहे, अशा परिस्थितीत दोघांनाही रोडीजच्या चाहत्यांकडून ट्रोल होण्याची भीती आहे. याच कारणामुळे दोघांनीही रियासोबत शूट करण्यास नकार दिला आहे. मात्र, या वृत्तांमध्ये किती तथ्य आहे, हे या तिघांनाच माहीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspring Story Engineer Marries Farmer: इंजिनियर वैष्णवीने निवडला शेतकरी जोडीदार; 'मानसिकता बदलण्याची गरज' असल्याचे आवाहन

'मी अनेक मुलींसोबत रिलेशनमध्ये होते' गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा खुलासा, म्हणाली... 'मुलींसोबत इतकी इंटिमेट...'

Marathi Live Updates : मुंबईत गेल्या २४ तासांत विक्रमी मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसही जोर कायम

Beed: 'तुकाराम मुंढे पॅटर्न'ची बीडमध्ये एन्ट्री?; एफडीएच्या धडक कारवाईने व्यापाऱ्यांची पळापळ, परवान्यासाठी महिनाभरात 2,241 अर्ज

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प, ३ फूटापर्यंत पाणी; नागोठणेपासून पर्यायी मार्गाने वाहतूक

SCROLL FOR NEXT