Prithvi Shaw esakal
मनोरंजन

Prithvi Shaw : 'ती माझी बायको नाही रे, कुणीतरी...' पृथ्वी शॉ ने नेटकऱ्यांना झापले!

भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध फलंदाज पृथ्वी शॉ च्या त्या गर्लफ्रेंडचे फोटो व्हायरल झाले आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले.

सकाळ डिजिटल टीम

Prithvi Shaw : भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध फलंदाज पृथ्वी शॉ च्या त्या गर्लफ्रेंडचे फोटो व्हायरल झाले आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर वाऱ्यासारखी ती बातमी पसरली. कित्येकांनी त्यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. बऱ्याचजणांनी कौतूकाचा वर्षावही केला. यासगळ्यात आता पृथ्वीची प्रतिक्रिया पुढे आली आहे.त्यानं त्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे.

पृथ्वी शॉ आणि निधी तापडिया यांचे ते फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर हे दोन्ही सेलिब्रेटी चर्चेत आले होते. नेटकऱ्यांनी त्यांना दिलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहेत. पृथ्वीचं आता कुठे करिअर सुरु झालं असून त्यात त्यानं लगेच संसाराची वाट धरली आहे की काय अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. सीआयडी फेम निधी तापडियासोबतच्या त्याच्या फोटोंवर नेटकरी फिदा झाले आहेत.

Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

Prithvi Shaw

भारतीय क्रिकेटपटूचे ते रोमँटिक फोटो पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. त्यावर आता पृथ्वीची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्यानं इंस्टावरुन ती पोस्ट शेयर केली आहे. त्यात तो म्हणतो, कुणीतरी माझ्यासोबत खोडसाळपणा केला आहे. माझा आणि त्या व्यक्तीचा कोणताही संबंध नाही. माझे कोणतेही रिलेशन नाही. ज्यांनी कुणी ती पोस्ट केली त्यांना मला सांगायचे आहे की, अशाप्रकारे एडिट करुन एखाद्याची बदनामी कृपया करु नका.

जो फोटो एडिट करण्यात आला होता त्यात असे म्हटले होते की, हॅप्पी व्हँलेटाईन डे माझी बायको...आणि हार्ट, किसिंगचे इमोजीही त्यात टाकण्यात आले होते. ती पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रश्न पडला की हे नेमकं आहे तरी काय, इंस्टाग्रामवरुन आता ती पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. मात्र अनेकांनी त्याचा स्क्रिन शॉट घेतला होता. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT