priti narnavare SYSTEM
मनोरंजन

घरच्यांनी दिलेल्या संधीचं केलं सोनं, विदर्भाची प्रीती झळकली अक्षयकुमारसोबत

केतन पळसकर

नागपूर : विदर्भातील झाडी बोली, वऱ्हाडी बोली बोलणाऱ्या कलावंतांना मायानगरीमध्ये (mumbai) सहजासहजी काम मिळत नाही, अशी ओरड सांस्कृतिक क्षेत्रातील विशिष्ट वर्गाकडून होते. मात्र, अशांना खोटे ठरवत उपराजधानीतील बहुजन रंगभूमीची कलावंत प्रीती नारनवरे (actor priti narnavare) ‘बॉलिवूड’मध्ये आपले पाय रोवते आहे. नुकतीच ती ‘फिलहाल’ या प्रसिद्ध हिंदी अल्बममध्ये अक्षयकुमारसोबत पडद्यावर झळकली आहे.

प्रीतीचे वडील मूळचे नागपूरचे. नोकरीनिमित्त चंद्रपूरमध्ये ते स्थायिक झाले. प्रीती लहानाची मोठी येथेच झाली. महाविद्यालयीन जीवनात तिला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. पुढे कॉस्मेटीकमध्ये पदवीचे शिक्षण घेण्यासाठी तीने नागपूर गाठले. हाच तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. मॉडेलिंग करता करता ती बहुजन रंगभूमीशी जोडल्या गेली आणि तीचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. या क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास मुंबई गाठणे आवश्‍यक आहे, हे तीला माहिती होते.

भाऊ आणि बहिण दोघेही डॉक्टर असल्याने साहजिकच तिच्याकडून पण कुटुंबीय खूप शिकून मोठे होण्याची अपेक्षा व्यक्त करीत होते. मात्र, तिने एक संधी घरच्यांना मागितली आणि त्या संधीचे सोने केले. एका मागोमाग एक काम मिळवत आज तीने दहा नाटक, सात मराठी चित्रपट आणि तब्बल १४ मालिका व वेब सिरीजमध्ये काम केले आहे. या पाच वर्षात अक्षयकुमारसह विक्की कौशल, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, आदित्य रावल (परेश रावल यांचे चिरंजीव) अशा अनेक कलावंतांसोबत काम केले आहे.

अभिनेता अक्षयकुमारसोबत स्क्रिीन शेअर करताना अभिनेत्री प्रीती नारनवरे
‘फिलहाल’ या अल्बममध्ये अक्षयकुमारसोबत कॅमेरासमोर संवाद साधायचा असल्याने फार दडपण होते. सहाय्यक दिग्दर्शकाने तालीम घेतली तेव्हा मी अनेकदा अडखळले. शेवटी तो क्षण आलाच. अक्षय यांनी मला म्हटले आपण थोडी तालीम करू. मला धीर दिला आणि केवळ दोन मिनटामध्ये आम्ही तो शॉट पूर्ण केला. सुरुवातीला असलेले दडपण त्यांच्या त्या साधेपणामुळे सहज पळून गेले. काम झाल्यावर त्यांनी कौतुक करीत शाबाशकीची थाप दिली.
-प्रीती नारनवरे, अभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT