priya marathe 
मनोरंजन

'सासरे फक्त म्हणायला, तो मला बाबापेक्षाही जवळचा'; श्रीकांत मोघेंसाठी प्रिया मराठेची भावूक पोस्ट

स्वाती वेमूल

सहा दशकांहून अधिक काळ रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते आणि नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांचे शनिवारी राहत्या घरी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हीरो अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र प्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे आणि सून प्रिया मराठे असा परिवार आहे. श्रीकांत मोघेंच्या आठवणीत अभिनेत्री प्रिया मराठेने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. सासरे फक्त म्हणायला, होता तो मला बाबापेक्षाही जवळचा, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या. 

प्रिया मराठेची पोस्ट- 
'माझा बाबा!
इतकं प्रेम , माझा नवरा सोडल्यास क्वचितच कोणी माझ्यावर केलं असेल. सासरे फक्त म्हणायला, होता तो मला बाबापेक्षाही जवळचा. माझं पीयूडं, माझं लाडकं अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की आज किती बुकिंग होतं प्रयोग कसा झाला पुढचा कुठे आहे असे सगळे प्रश्न विचारायचा. बाबा आणि मुलाचं हे असं नातं ही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुर्गळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं. गेली काही वर्षं तो व्हीलचेअरवर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठीसुद्धा उदासीनता पाहिली नाही. उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम पहिला. मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे, हे धोरण मानून कशातच तो फार अडकला नाही. हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील.'

श्रीकांत मोघे यांचा चित्रपटसृष्टी आणि नाटकातील प्रवास प्रदीर्घ होता. 'लेकुरे उदंड जाली' हे त्यांचं नाटक प्रचंड गाजलं. या नाटकाने श्रीकांत मोघे रंगभूमीवर अजरामर झाले. गुडघेदुखीचा त्रास होत असल्याने गेली काही वर्षे घरातल्या घरात व्हीलचेअरवर बसून ते नाटकातील स्वगतं आणि कवी सुधीर मोघे यांच्या कवितांचं सादरीकरण करत असत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

PMC Corruption : पुण्यात एकाच रस्त्यावर दुबार खर्चाची निविदा, ३१ लाखांचा वाद

Latest Marathi News Live Update: सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या फ्लॅटमधून अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरीला

Dombivli Crime : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रामनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; 37 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

तो फार कमी कार्यक्रमांना यायचा... अदिती द्रविडने सांगितला काका राहुल द्रविडसोबतचा बालपणीचा अनुभव

SCROLL FOR NEXT