Priya Prakash Varrier
Priya Prakash Varrier  
मनोरंजन

शूटिंगदरम्यान कोसळली प्रिया वारियर; स्वत:च पोस्ट केला व्हिडीओ

स्वाती वेमूल

'एक्स्प्रेशन क्वीन', 'नॅशनल क्रश', 'वींक गर्ल' अशा विविध नावांनी ओळखली जाणारी अभिनेत्री प्रिया वारियर तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. या चित्रपटात ती प्रसिद्ध अभिनेता नितीनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मात्र शूटिंगदरम्यान प्रिया जमिनीवर कोसळली. नंतर त्याचा व्हिडीओ तिने स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. 

या सीनमध्ये नितीन तिला पाठीवर उचलून घेणार असतो. प्रिया मागून पळत येते. मात्र पाठीवर चढताना तिचा तोल जातो आणि ती जोरात खाली आदळते. यानंतर सेटवरील क्रू मेंबर प्रियाच्या मदतीला धावून येतात. शूटिंगदरम्यान घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 'प्रत्येकवेळी मी विश्वास ठेवून झेप घेऊ इच्छिते आणि प्रयत्न करते तेव्हा आयुष्य मला कसं खाली पाडतं, त्याचं हे दृश्य आहे', असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय. प्रियाच्या या व्हिडीओला नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी तिला कमेंटमध्ये काळजी घेण्यास सांगितलं आहे. 

'ओरु अदार लव्ह' या मल्याळम चित्रपटातील 'माणिक्य मलरया पूवी' या गाण्यातील प्रियाचा एक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या सीनमधील तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अक्षरश: भुरळ घालणारे होते. इथूनच प्रिया प्रकाशझोतात आली आणि सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा होऊ लागली. चित्रपटापेक्षा सर्वांत जास्त प्रसिद्धी प्रियाला मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT