राखीच्या मदतीला धावून आला 'भाईजान'; कॅन्सरग्रस्त आईने हात जोडून मानले आभार

rakhi and salman
rakhi and salman

राखी सावंत 'बिग बॉस १४'च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. मात्र १४ लाख रुपये स्वीकारून तिने तिथून माघार घेतली. आई कॅन्सरग्रस्त असून तिच्या उपचारासाठी पैसा हवा असल्याचं तिने नंतर स्पष्ट केलं. त्यानंतर तिने रुग्णालयातील आईचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत, तिच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं होतं. आता राखी सावंतच्या मदतीला 'भाईजान' म्हणजेच अभिनेता सलमान खान धावून आल्याचं कळतंय. राखीच्या आईच्या उपचारासाठी सलमान व सोहैल खान मिळून मदत करत आहेत. या मदतीबद्दल समजताच राखी सावंतच्या आईनेही त्यांचे आभार मानले आहेत. 

राखीने आईचा एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये त्या सलमान व सोहैल खान यांचे आभार मानताना दिसत आहेत. "माझी किमोथेरेपी सुरू आहे. चार किमो झाले असून दोन बाकी आहेत. सलमान व सोहैल तुमच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत आणि तुम्ही सुखी-समाधानी राहा", असा आशीर्वाद त्या देत आहेत. 

राखीने पोस्ट केला होता फोटो
माझ्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, ती कर्करोगाशी झुंज देत आहे, अशी पोस्ट राखीने लिहिली होती. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत तिची व आईची काळजी घेण्याचं सांगितलं होतं. देवोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई, काम्या पंजाबी यांसारख्या सेलिब्रिटींनी तिला खंबीर साथ दिली. 

पतीपासून घेणार घटस्फोट
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर राखीने तिच्या पतीविषयी खुलासा केला. लग्नाच्या दिवशीच माझा पती मला सोडून गेला, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं. आता त्याला घटस्फोट देणार असल्याचा विचार राखीने बोलून दाखवला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com