priyanka chopra 
मनोरंजन

'अभिनेत्री व्हायचं असेल तर आधी सर्जरी कर, दिग्दर्शकाची होती अट'

स्वाती वेमूल

बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात प्रियांका चोप्रा सध्या तिच्या 'अनिफिनिश्ड' या पुस्तकामुळे चर्चेत आहे. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. यामध्ये तिने एका दिग्दर्शकाचा उल्लेख केला, ज्यांनी तिला प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. 

पुस्तकात त्या घटनेचा उल्लेख करत प्रियांकाने लिहिलं, 'मी कामानिमित्त एका दिग्दर्शकाला भेटायला गेले होते. बोलता बोलता त्यांनी मला अचानक उभं राहायला सांगितलं. बराच वेळ ते माझं निरीक्षण करत होते. तुला जबडा, ब्रेस्ट आणि बट सर्जरी करण्याची गरज आहे, असा अजब सल्ला त्यांनी मला दिला. जर मला अभिनेत्री व्हायचं असेल तर प्लास्टिक सर्जरी करावी लागेल असं ते म्हणाले. लॉस एंजिलिसमध्ये मी एका डॉक्टरला ओळखतो, तिथे जाऊन तू सर्जरी कर असं त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर मी माझा आत्मविश्वासच गमावला. तेव्हापासून मी स्वत:ला खूप कमी लेखू लागले होते.'

प्रियांकाने इतक्या वर्षांनंतर आता या घटनेचा खुलासा का केला असा प्रश्न तिला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. "मी कोणाला कोणत्याच गोष्टींचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्या घटनेचा खुलासा केला नाही. बॉलिवूड इंडस्ट्री ही पुरुषप्रधान आहे आणि माझी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली. करिअरच्या सुरुवातीलाच जर मी अशा घटनांचा खुलासा केला असता तर लोकांनी माझा पाय खेचायचा पुरेपर प्रयत्न केला असता. मी त्या गोष्टींबद्दल कोणालाच काही बोलले नाही. मी माझं काम केलं आणि त्यातून पुढे आले. आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला त्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. म्हणून त्या घटनांचा पुस्तकात उल्लेख केला", असं ती 'एशियन स्टाइल मॅगझिन'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT