Malti waves at crowd during Nick Jonas' concert Priyanka Chopra and her daughter Malti Marie  Esakal
मनोरंजन

Priyanka Chopra Daughter Malti: प्रियंका अन् निकची लेक आत्तापासूनच ग्लोबल स्टार! मालतीचा व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Priyanka Chopra and her daughter Malti Marie Video: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सध्या वर्ड टूरवर आहेत. हे कपल सोशल मिडीयावर चर्चेत असते. प्रियंका आणि निक यांची जोडी सोशल मिडीयावर कमालीची पसंत केली जाते. तर निकच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आता अलीकडेच, देसी गर्ल तिच्या लेकीसोबत निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र यात प्रियंकाच्या लेकीने सर्वांचे लक्ष वेधले.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळतं की प्रियांका चोप्राची लेक मालती मेरी चोप्रा जोनस तिच्यासारखीच ग्लोबल स्टार बनली आहे. मालतीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. तिचे फोटो आणि व्हिडिओ काही मिनिटातच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत प्रियंका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आहे. तिने मालतीला पकडलेले आहे. प्रियंका आणि मालती बाहेर येताना मालती गर्दीच्या दिशेने हात फिरावते आणि सर्वाचा निरोप घेऊन जाऊ लागते.

मालतीनं केलेला 'बायबाय' आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालतीची ही कृती पाहून प्रियंकालाही हसू आवरलं जात नाही. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून नेटकरी प्रियंकाच्या लेकीवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. इतक्या लहान वयात प्रियंका आणि निकच्या लेकीनं जगात ओळख मिळवल्याचं नेटकरी बोलत आहे.

यापुर्वी देखील मालतीनं सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते. निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये मालती आणि प्रियंकाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यात प्रियंका मुलगी मालतीला घेऊन स्टेजजवळ उभी होती.

तर निक स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. वडिलांना गाताना पाहून मालती त्याला चीअर अप करताना दिसली तर टाळ्या वाजवत नाचताना दिसली. तर निक जोनासनं देखील मालतीवर प्रेमाचा वर्षाव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT