priyanka chopra Sakal
मनोरंजन

Priyanka Chopra: 'आईने दिला होता Eggs Freeze करण्याचा सल्ला, त्यामुळं आयुष्य आणि करिअर दोन्ही बदललं', अभिनेत्रीचा मोठा खुलासा

प्रियांका चोप्राने एक मोठा खुलासा केला आहे तिने बॉलिवूड सोडण्यापासून ते निक जोनासशी लग्न व एग्ज फ्रीझ करण्याबद्दलही भाष्य केलं.

सकाळ डिजिटल टीम

हिंदी सिनेसृष्टीपासून हॉलिवूडपर्यंत आपली खास ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी वेब सीरिज 'सिटाडेल 2'मुळे चर्चेत आहे. प्रियांकाचे नाव तिच्या दमदार अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे. दरम्यान, प्रियांका चोप्राने एक मोठा खुलासा केला आहे तिने बॉलिवूड सोडण्यापासून ते निक जोनासशी लग्न व एग्ज फ्रीझ करण्याबद्दलही भाष्य केलं.

अलीकडेच प्रियांका चोप्राने डॅक्स शेफर्डला लेटेस्ट मुलाखत दिली आहे. यादरम्यान प्रियंका चोप्राने तिच्या आई होण्याच्या स्वप्नाविषयी खुलेपणाने सांगितले आहे. प्रियांका चोप्राने सांगितले की, 'मला मुले खूप आवडतात.

युनिसेफमध्येही मी मुलांसोबत बराच वेळ घालवला आहे. मला नेहमीच आई व्हायचे होते कारण मला मुले फार आवडतात. मी माझ्या ३० व्या वर्षी बीजांड गोठवून (Eggs Freeze) घेतले होते. माझ्या आईने मला समजावून सांगितले की ३५ वर्षांच्या वयानंतर मुलं होण्यात अडचण येते."

अशा परिस्थितीत मी संपूर्ण वैद्यकीय प्रक्रियेतून हे काम केले. त्यावेळी माझे लग्नही झाले नव्हते आणि मी निक जोनासला डेटही करत नव्हते. पण बीजांड गोठवल्याने मला खूप फायदा झाला. कारण बीजांड गोठवल्यानंतर ते तसेच राहतात. मला मुलं हवी होती म्हणून मी ते केलं.”

priyanka chopra

2018 मध्ये प्रियांका चोप्राने हॉलिवूड सुपरस्टार निक जोनाससोबत लग्न केले. अशा परिस्थितीत, जानेवारी 2022 मध्ये, लग्नाच्या 3 वर्षानंतर, प्रियांका चोप्रा सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासची आई झाली. प्रियांका चोप्राने आरोग्याच्या समस्यांमुळे सरोगसीचा मार्ग स्वीकारल्याची माहिती आहे. सध्या प्रियांका चोप्रा तिच्या लाडकी मालतीसोबतचे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Kasba Beed Gold Coins : शिलाहार राजवंशाची उपराजधानी असलेल्या कोल्हापूरच्या 'या' गावात पुन्हा सापडल्या सुवर्णमुद्रा! काय आहे अतिप्राचीन 'बेडा' आणि त्रिशूळाचे रहस्य?

SCROLL FOR NEXT