priyanka chopra  Esakal
मनोरंजन

Priyanka Chopra: देसी गर्लनं पुन्हा केली कमाल! बनली 'अकादमी ऑफ मोशन पिक्चर'ची सदस्य

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने केवळ भारताच नव्हे तर जगभर तिच्या अभिनयाने आणि सौदर्याने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्मीण केले आहे. तिने आता स्वत:ला केवळ भारतापुरताच मर्यादित ठेवलं नसून जागतिक स्तरावर तिची ख्याती पसरवली आहे.

प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. एकीकडे अभिनेत्री तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेब सीरिजमुळे चर्चेत असतानाच आता तिने पुन्हा भारताची मान गर्वाने उंचावणारे काम केले आहे.

खरं तर, देसी गर्लने पुन्हा एकदा भारताचा अभिमान आणि सन्मान वाढवला आहे. प्रियांका चोप्रा 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'च्या सदस्यांमध्ये सामील होणार आहे. अशी बातमी समोर आली आहे.

प्रियांका ही केवळ तिच्या अप्रतिम अभिनय कौशल्यांसाठीच ओळखली जात नाही तर ती व्यावसायिक आणि लेखिका देखील आहे. त्याचबरोबर ती लोकांची मदतही करत असते. सर्वांमध्ये लोकप्रिय प्रियांका चोप्रा तिच्या करिअरसोबतच इतर अनेक गोष्टींद्वारे लोकांशी जोडली गेली आहे.

ती 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'ची सदस्य बनली आहे, ज्यासाठी तिला संस्थेच्या सदस्य मंडळाकडून आमंत्रण मिळाले आहे. 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'चे सदस्य होण्यासाठी त्याच्या आमंत्रणासोबतच ऑस्कर नामांकनही आवश्यक आहे.

विशेष म्हणजे प्रियांका चोप्राच्या 'व्हाइट टायगर' या चित्रपटालाही ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते. या चित्रपटात प्रियांकाने अभिनयासोबतच त्याची निर्मितीही केली होती. प्रियांका अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसची सदस्य होणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.

प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज 'सिटाडेल'मध्ये काम करताना दिसणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा प्रियांकाचा अॅक्शन अवतार तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

याशिवाय 'लव्ह अगेन' या चित्रपटातही प्रियांका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हॉलिवूड प्रोजेक्ट्ससोबतच, अभिनेत्रीकडे फरहान अख्तरचा 'जी ले जरा' देखील आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफ तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT