priyanka nick sophie turner 
मनोरंजन

प्रियांकाच्या घरी आला नवा पाहुणा, जोनास कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूडमधून हॉलीवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनास यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. निकचा मोठा भाऊ जोए जोनास आणि वहिनी सोफी टर्नर यांनी नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे जोनास कुटुंबामध्ये या लहानग्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचं वातावरण आहे.

सोफी टर्नर यांच्या प्रतिनिधीने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे, सोफी टर्नर आणि जोए जोनास यांना सांगताना आनंद होत आहे की त्यांच्या घरी एका छोटी परीचा जन्मचा झाला आहे. मुलीचं नाव विला ठेवलं आहे आणि तिचा जन्म लॉस एंजेलिसमध्ये झाला आहे. जोनास आणि सोफी टर्नर हा आनंदाचा क्षण त्यांच्या कुटुंबासोबत आणि मित्र परिवारासोबत शेअर करणार आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आता काका-काकी झाले आहेत. प्रियांका सोफीच्या खूप जवळची आहे. प्रेग्नंसीच्या वेळेस सोफी टर्नर प्रियांका चोप्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये दिसून आली होती. यासोबतंच सोफी प्रियाका आणि निकच्या लग्नाचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये देखील दिसली होती. त्यावेळी सोफीच्या प्रेग्नंसीची सुरुवात होती. 

सोफीने 'गेम ऑफ थ्रोन'सारख्या प्रसिद्ध कार्यक्रमात काम केलं आहे. सोफीने एका मुलाखतीत सांगितलं होती की जोए जोनास आणि तिची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. दोघेही तासनतास एकमेकांशी गप्पा मारायचे. ऑक्टोबर २०१७मध्ये दोघांच्या साखरपुड्याचा खुलासा झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी दोघांनी दोन समारंभ करत लग्न केलं होतं. 

priyanka chopra jonas brother in law joe jonas and sophie turner blessed with baby girl

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT