Priyanka Chopra Esakal
मनोरंजन

Priyanka Chopra: प्रियंका चोप्राने 'या' दिग्दर्शकाला विकली मुंबईतील दोन आलिशान घरं, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Priyanka Chopra sells two Mumbai apartments: रणवीर सिंगनंतर आता प्रियंका चोप्राने मुंबईतील दोन घरे विकली आहेत.

Vaishali Patil

Priyanka Chopra sells two Mumbai apartments: मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे प्रियंका चोप्रा. तिने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने स्वत: चे स्थान कायम केले आहे. 2018 मध्ये निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियंका लॉस एंजेलिसमध्ये राहण्यास गेली आहे. ती तिथे निक आणि तिची लेक मालती मेरी चोप्रा जोनाससोबत राहते.

प्रियंका अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता अलीकडेच प्रियंकाने तिचे मुंबईतील दोन अपार्टमेंट चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अभिषेक चौबे यांना विकले असल्याचा दावा मिडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. प्रियंकाने मुंबईतील अंधेरी येथील तिचे दोन अपार्टमेंट दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक चौबे यांना तब्बल सहा कोटी रुपयांना विकले असल्याचे बोलले जात आहे.

लोखंडवाला परिसरात करण अपार्टमेंट टॉवरच्या 9व्या मजल्यावर प्रियंकाचे हे घर आहे. प्रियंकाने आई मधु चोप्रा यांच्या मदतीने 23 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर रोजी हा व्यवहार केला. दोन्ही फ्लॅट एकूण 2,300 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहेत.

यासाठी अभिषेक चौबे यांनी एकूण 36 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. यापुर्वी प्रियंकाने लोखंडवाला येथील एक मालमत्ता 7 कोटी रुपयांना एका डॉक्टरला विकली होती. आता प्रियंका परदेशात असल्यामुळे तिचे या मालमत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याने तिने हे घर विकले असल्याच्या चर्चा आहे.

प्रियंकाने 2003 मध्ये 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आता ती हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ करत आहे.

तिच्या वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर प्रियंका चोप्रा 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये जॉन सीना आणि इद्रिस एल्बासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत काम करणार आहे. त्याचबरोबर ती डॉन 3 मध्ये रणवीर सिंह सोबत स्क्रिन शेयर करणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT