Priyanka chopra, Madhu Chopra Instagram
मनोरंजन

Priyanka Chopra च्या हातातून अनेक बॉलीवूडचे सिनेमे गेले कारण.., आता आईनेही खुलासा करत उडवली खळबळ

'बॉलीवूडमध्ये मला सिनेमे ऑफर होणं बंद झालं,मला एकटं पाडलं अन् मी बॉलीवूड सोडलं..',असं म्हणत प्रियंकानं काही दिवसांपूर्वी सर्वांनाच धक्का दिला होता.

प्रणाली मोरे

Priyanka Chopra: काही दिवसांपूर्वी प्रियंकानं बॉलीवूड सोडल्याचं कारण सांगून अनेकांना धक्का दिला होता. त्याची जोरदार चर्चा रंगलेली सर्वांनी पाहिली. त्यानंतर आता मधु चोप्रांनी देखील आपल्या मुलीच्या करिअरविषयी मोठा खुलासा केला आहे.

त्या म्हणाल्या आहेत की, ''प्रियंकाला काही सिनेमांतील सीन खटकले..तिनं ते करण्यास नकार दिला आणि करिअरच्या सुरुवातीला तिच्या हातातून बरेच प्रोजेक्ट गेले''. (priyanka chopra lost many films as she refused to do some scenes...)

मधु चोप्रा म्हणाल्या, ''प्रियंका आणि मी आम्हा दोघींनाही बॉलीवूड नवीन होतं. ग्लॅमर इंडस्ट्रीशी आमचा दुरूनही संबंध नव्हता. त्यामुळे तिनं आंधळेपणानंच या इंडस्ट्रीवर विश्वास ठेवला होता आणि मी देखील आंधळेपणानं तिच्या त्या विश्वासावर विश्वास ठेवला होता''.

''मी लॉ शिकले आहे आणि फायनान्सविषयी मला ज्ञान होतं. त्यामुळे मी तिच्या कायदे संबंधित गोष्टींमध्ये लक्ष द्यायचे..अर्थात तिचा स्वतःचा चांगला वकील होताच तरीदेखील. मी तिच्या व्यावहारीक विषयातही आवर्जुन लक्ष द्यायचे. मी तिच्यासोबत प्रत्येक ठीकाणी असायचे..मग ते एखाद्या स्क्रीप्टचं वाचन असू दे किंवा सिनेमा संबंधित मीटिंग असू देत''.

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मधु चोप्रा पुढे म्हणाल्या, ''एक दिवस आम्ही दोघींनी मिळून निर्णय घेतला की प्रियंकाची कोणतीही मीटिंग नसेल तर ती कुठेही बाहेर जाणार नाही..संध्याकाळी सात-साडे सात नंतर ती कुठेही जाणार नाही. आणि या निर्णयावर ती कायम राहिली''.

''माझ्या मुलीनं अशी कोणतीच गोष्ट केली नाही जी तिला पटली नाही. आणि म्हणूनच तिच्या हातातून अनेक सिनेमे गेले कारण त्यातले काही सीन करायला तिनं नकार दिला. त्या सीनची सिनेमात गरजच नाहीय तर उगाचच मी ते का करु असं म्हणत प्रियंका तोंडावर सिनेमाला नाही म्हणायची''.

काही दिवसांपूर्वी प्रियंकानं बॉलीवूडनं आपल्या कॉर्नरला केलं म्हणून आपण या इंडस्ट्रीला सोडलं असं म्हटलं होतं. पण त्यानंतर मधु चोप्रांनी प्रियंकाच्या करिअरविषयी हा खुलासा करत पुन्हा एकदा या वादातीत मुद्द्याला तोंड फोडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT