priyanka chopra 
मनोरंजन

"डान्सदरम्यान दिग्दर्शकाने अंतर्वस्त्रापर्यंत कपडे काढण्यास सांगितले"; प्रियांकाचा मोठा खुलासा

स्वाती वेमूल

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राची एक मुलाखत सध्या फार चर्चेत आहे. अमेरिकन टॉक शोमध्ये ओप्रा विनफ्रेला दिलेल्या या मुलाखतीत प्रियांकाने तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. बॉलिवूडमध्ये करिअरच्या सुरुवातीला एका दिग्दर्शकाने सेटवर गैरवर्तणूक केल्याचा धक्कादायक खुलासाही तिने या मुलाखतीत केला. त्या घटनेनंतर संबंधित दिग्दर्शकाविरोधात आवाज न उठवल्याचा पश्चात्ताप आजही होत असल्याचं तिने सांगितलं. त्या दिग्दर्शकाने प्रियांकाला बोल्ड डान्स करण्यास सांगितलं आणि त्या डान्सदरम्यान अंतर्वस्त्रापर्यंत तिचे कपडे तिला काढण्यास सांगितलं होतं. हा प्रसंग सांगताना मात्र तिने त्या दिग्दर्शकाचं नाव उघड केलं नाही. 

"माझ्या आईने नेहमीच मला चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यास शिकवलं. पण त्या घटनेनंतर मी त्या दिग्दर्शकाविरोधात आवाज उठवला नाही, याचा मला आजही पश्चात्ताप होतो. त्यावेळी मी खूपच घाबरली होती. इंडस्ट्रीत मी नवीनच होते आणि त्या घटनेनंतर माझ्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित केला जाईल अशी भीती मनात होती. त्यामुळे मी प्रवाहासोबतच जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी मी त्या चित्रपटातून काढता पाय घेतला. कारण त्या घटनेचा सामना कसा करावा हे मला समजत नव्हतं", असं प्रियांका म्हणाली. 

प्रियांकाने सौंदर्यस्पर्धांपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. 'मिस इंडिया' आणि 'मिस वर्ल्ड' अशी दोन्ही किताबं तिने तिच्या नावे केली. 'मिस वर्ल्ड' जिंकल्याच्या तीन वर्षांनंतर तिने बॉलिवूडमध्ये 'द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये तीने सनी देओल आणि प्रिती झिंटासोबत सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. यानंतर तिचे 'अंदाज', 'मुझसे शादी करोगी', 'ऐतराज' यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. तिने आतापर्यंत 'दोस्तान', 'बर्फी', 'मेरी कोम', 'फॅशन', 'कमिने', 'सात खून माफ', 'बाजीराव मस्तानी', 'द स्काय इज पिंक', 'डॉन' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Film Industry: मातीशी पुन्हा जुळलेली ‘नाळ’

Adai Dosa Recipe: पीठ आंबवण्याची गरज नाही; झटपट बनवा प्रोटीनयुक्त 'अडई डोसा'! पौष्टिक आणि चवदार दाक्षिणात्य नाश्ता... 

Daily Horoscope: गुरुवार ५ नाेव्हेंबर राशीभविष्य

IND vs NZ, 1st ODI: विराटचं अर्धशतक, अर्शदीपच्या ४ विकेट्स, तरी अंशुल कंबोज कसा ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'? म्हणाला, एक वाईट सामना...

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

SCROLL FOR NEXT