Actress Priyanka Chopra  
मनोरंजन

'निक जोनासची पत्नी' म्हणून उल्लेख केल्याने प्रियांका भडकली

चिडलेली प्रियांका म्हणाली, 'तुमच्यासाठी मी माझी IMDb ची लिंक इथे जोडू का?'

स्वाती वेमूल

'निक जोनासची पत्नी' असा उल्लेख करणाऱ्या एका न्यूज आऊटलेटला अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) सुनावलं. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट करत प्रियांकाने राग व्यक्त केला. 'मी सर्वांत मोठ्या चित्रपटाच्या फ्रँचाइसचं प्रमोशन करतेय आणि तरी माझा उल्लेख निक जोनासची पत्नी असा केला जातोय', असं तिने त्यात म्हटलंय. गेल्या आठवडाभरापासून प्रियांका तिच्या 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स' (The Matrix Resurrections) या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. याच प्रमोशनचा एक भाग म्हणून चित्रपटाविषयीचा लेख एका वृत्तात छापला गेला होता. मात्र त्यात प्रियांकाचा अभिनेत्री म्हणून उल्लेख न करता निक जोनासची पत्नी म्हणून उल्लेख केल्याने तिला संताप व्यक्त केला आहे.

लेखाचा स्क्रीनशॉट इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट करत प्रियांकाने लिहिलं, 'हे खूपच मनोरंजक आहे की मी आतापर्यंतच्या सर्वात प्रतिष्ठित चित्रपट फ्रँचाइजीपैकी एकाचं प्रमोशन करतेय आणि मला अजूनही '...ची पत्नी' म्हणून संबोधलं जातंय. कृपया मला याचं स्पष्टीकरण द्या की हे एखाद्या महिलेसोबत कसं घडू शकतं? तुम्हाला समजण्यासाठी मी माझी IMDbची लिंक इथे पोस्ट करू का?' या पोस्टमध्ये प्रियांकाने तिच्या पतीलाही टॅग केलं आहे.

प्रियांका या संपूर्ण आठवड्यात चित्रपटाचं प्रमोशन करतेय आणि अनेक प्लॅटफॉर्म्सवर निकसुद्धा याबद्दल बोलला आहे. अलीकडेच जेडा पिंकेट स्मिथच्या 'रेड टेबल टॉक' या शोच्या १००व्या भागात, प्रियांकाने खुलासा केला की निक या चित्रपट फ्रँचाइजीचा खूप मोठा चाहता आहे. इतकंच नव्हे तर प्रियांका या चित्रपटाचा एक भाग असल्यामुळे त्याने त्याच्या चाहत्यांसमोरही खूप कौतुक केल्याचं तिने सांगितलं.

'द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स' हा चित्रपट एचबीओ मॅक्स आणि थिएटर्समध्ये येत्या २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रियांकासोबत केनू रीव्हस, कॅरी-अ‍ॅनी मॉस, जेडा, नील पॅट्रिक हॅरिस, याह्या अब्दुल-मतीन II, जोनाथन ग्रोफ यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

SCROLL FOR NEXT