priyanka chopra  Sakal
मनोरंजन

Priyanka Chopra: प्रियांकाने अशा प्रकारे मुलगी मालतीसोबत साजरा केला ईस्टर! अभिनेत्रीने सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर

अभिनेत्रीच्या लाडक्या मालतीने यावर्षी तिचा पहिला इस्टर साजरा केला. यावेळी प्रियांकाने मालतीसोबतचे तिचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Aishwarya Musale

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते आणि सोशल मीडियावर तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते. यासोबतच प्रियांका तिची मुलगी मालती मेरी चोप्राचे सुंदर फोटोही शेअर करत असते. अभिनेत्रीच्या लाडक्या मालतीने यावर्षी तिचा पहिला इस्टर साजरा केला. यावेळी प्रियांकाने मालती मेरीसोबतचे तिचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्रियंका चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर इस्टर सेलिब्रेशनमधील मालतीच्या फोटोंची सिरीज शेअर केली आहे. पहिल्या फोटोमध्ये मालती तिची आई प्रियंकासोबत दिसत आहे. या फोटोत मालतीने पांढरा टी-शर्ट घातला असून त्यावर मालती मेरी फर्स्ट इस्टर लिहिले आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने मालतीला पकडलेले दिसत आहे.

दुस-या फोटोत, प्रियंकाने तिच्या मुलीसोबत नाईट सूटमध्ये ट्विनींग केले आहे आणि ती बाथरुममध्ये मालतीसोबत मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. तिसर्‍या फोटोत मालती एकटी बसली आहे आणि हातात काहीतरी धरलेली दिसत आहे, तर शेवटच्या फोटोत मालती तिच्या लॉनमध्ये सोफ्यावर बसलेल्या कुत्र्यांशी खेळत आहे.

हे फोटो शेअर करत प्रियंका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'इस्टर संडे.' त्याच वेळी, चाहते अभिनेत्रीच्या मुलीच्या गोंडस फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याआधीही प्रियांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर फ्लॉवर हेअर बँडसह पांढरा आणि पिवळा आउटफिट घातलेला मालतीचा एक गोंडस फोटो शेअर केला होता. यासोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "सर्वांना ईस्टरच्या शुभेच्छा."

priyanka chopra

प्रियांका नुकतीच मुलगी मालती आणि पती निक जोनाससोबत भारतात आली होती. यापूर्वी ती निकसोबत मुंबईतील NMACC कार्यक्रमात सहभागी होताना दिसली होती. यानंतर, अभिनेत्रीने सहकलाकार रिचर्ड मॅडनसह तिच्या आगामी सिटाडेल सिरीजचे प्रमोशन केले. या स्पाय थ्रिलरमध्ये प्रियंका गुप्तहेर एजंट नादियाची भूमिका साकारत आहे. तिच्या भारत प्रवासादरम्यान प्रियंका तिच्या मुलीसोबत देसी लूकमध्ये सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT