priyanka chopra instagram
मनोरंजन

निकने प्रियांकाला दिली तब्बल इतक्या कोटींची अंगठी

प्लॅटिनम आणि डायमंडच्या या अंगठीची किंमत वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केल्यानंतर लॉस एंजिलिसला राहायला गेली. परदेशातही तिने नुकतंच जल्लोषात दिवाळी सण साजरा केला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांका तिच्या कुटुंबीयांविषयी व्यक्त झाली. सासरचं घर म्हणजे माझ्यासाठी जणू 'जन्नत' आहे, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या. या मुलाखतीत तिने तिच्या साखरपुड्याच्या अंगठीविषयीही सांगितलं. "तुझ्याकडे असलेला सर्वांत खास दागिना कोणता", असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

'वोग अरेबिया'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका म्हणाली, "सर्वांत खास दागिना म्हणून जर मी माझ्या साखरपुड्याच्या अंगठीचा उल्लेख केला नाही तर माझा नवरा (निक जोनास) मला मारून टाकेल." असं म्हणताना ती जोरात हसली. प्रियांका पुढे म्हणाली, "मी मस्करी करतेय. पण ती रिंग माझ्यासाठी खूप खास आहे. प्रत्येक दागिन्यासोबत काही ना काही आठवणी जोडलेल्या असतात. म्हणून माझ्यासाठी माझे दागिने खूप महत्त्वाचे आहेत." २०१८ मधील हॉलिवूड रिपोर्टरने दिलेल्या एका वृत्तानुसार, प्रियांकाच्या या अंगठीची किंमत ही जवळपास २.१ कोटी रुपये इतकी आहे. प्लॅटिनम आणि डायमंडची ही अंगठी आहे.

cतुझ्यासाठी स्वर्ग म्हणजे काय, असा तिला पुढे प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने सांगितलं, "माझं स्वर्ग माझ्या कुटुंबीयांसोबत आहे. मला माझं कुटुंब, माझे मित्र यांच्यासोबत राहायला फार आवडतं. उर्दू आणि हिंदी भाषेत स्वर्गला 'जन्नत' असं म्हणतात. त्यामुळे माझ्यासाठी माझं जन्नत हे माझं घर आहे." प्रियांका आणि निकने २०१८ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर ती 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात फरहान अख्तरसोबत दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Repo Rate Hike: 44 महिन्यांनंतर RBIचा मोठा निर्णय! रेपो रेट वाढवला; कर्ज आणि EMI किती महागणार? FD करणाऱ्यांना काय फायदा?

Gyanesh Kumar : राहुल गांधींच्या आंदोलनानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ज्ञानेश कुमार यांचा 'या' राज्यातील दौरा स्थगित

Petrol-Diesel CNG Price: पुण्यात CNGच्या दरात वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलही महागले? मुंबईसह राज्यभरात नवे दर किती?

Latest Marathi News Live Update : 'इंडिया' आघाडीच्या निदर्शनानंतर जंतरमंतर परिसरात कडक सुरक्षा

Explained : SIR विरोधात 'इंडिया' आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास विरोधकांची पुढची रणनीती काय? वाचा...

SCROLL FOR NEXT