producer nikhil sane special post for hemant dhome kshiti jog for jhimma 2 SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: खरंतर पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर... प्रसिद्ध निर्मात्याची झिम्मा २ बद्दल पोस्ट चर्चेत

झिम्मा २ आज संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालाय. त्याबद्दल निर्माते निखिल साने यांनी खास पोस्ट लिहीली आहे

Devendra Jadhav

Jhimma 2 Movie: आज संपूर्ण महाराष्ट्रात 'झिम्मा'मय माहोल आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. लेखक - दिग्दर्शक हेमंत ढोमेचा बहुचर्चित - बहुप्रतिक्षित झिम्मा २ आज रिलीज झालाय.

या सिनेमाविषयी मराठी मनोरंजन विश्वातले लोकप्रिय कलाकार पोस्ट शेअर करत आहेत. अशातच सिनेमाचे निर्माते निखिल सानेंनी झिम्मा २ विषयी पोस्ट शेअर करत हेमंत आणि क्षितीला खास शुभेच्छा दिल्यात.

निखिल साने लिहीतात, "‘झिम्मा २’ आज प्रदर्शित होत आहे.. सर्वत्रच त्याची उत्सुकता आहे.. आणि आम्ही सर्वच जण प्रतिसादाची वाट बघत आहेत..

पण आजच्या या दिवसामागे दोघा जणांची प्रचंड धडपड, मेहनत, passion आहे. खरतंर पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर एक complacency येते, पण यावेळेस तर ते अधिक जोमाने काम करत आहेत. आजही अनेक बारीकसारीक गोष्टींमधे स्वतः लक्ष घालत आहेत, आजही कुठच्या shows ना कधी भेट द्यायची, पुढचं planning कसं करूया अश्या अनेक गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष आहे.

निखिल साने पुढे लिहीतात, "पण यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी गेल्यावेळेस लिहिल्याप्रमाणे, दुसरा भाग अधिक रंजक, प्रेक्षणीय आणि भावनिक ऋणानुबंध दृढ करणारा तर झाला आहेच. चित्रपट एकीकडे एक सुंदर, mature अनुभव तर देतोच. पण अतिशय सहज वाटणारी एक अत्यंत कठीण गोष्ट त्याने साधली आहे ती म्हणजे जिथे पहिला भाग संपतो तिथूनच दुसरा भाग अगदी सहजपणे पुढे जातो.. म्हणजे तुम्ही दुसरा भाग बघत आहात हे तुमच्या लक्षातही येत नाही इतकी सहजता achieve केली आहे.. आणि हेच या दोघांचं सगळयात महत्त्वाचं यश आहे!"

निखिल साने शेवटी लिहीतात, "हेमंत आणि क्षिती, तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन! आजचा दिवस, आजचं हे यश तुमचं आहे! Enjoy every moment of it!

My best wishes are always with you!
With Love and Respect, Nikhil

ता.क. - हा फोटो त्यांच्या लग्नातील नाहीए, rather तेव्हा न बोलवल्यामुळे, तेव्हा राहिलेला फोटो यावेळेस मीच काढून घेतला आहे!

याचबरोबर या सगळ्याच्या पाठीमागे असलेल्या ज्योती देशपांडे, आनंद राय आणि इतर सहकाऱ्यांचेदेखील खूप खूप आभार !"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Fall Incident : पुण्यातील विमाननगरमध्ये चालत्या गाडीवर कोसळलं गुलमोहराचं झाड; सुदैवाने जीवितहानी टळली, पण वाहतूक कोंडीचा नागरिकांना फटका

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB वर आरोप... ते ५ परदेशी खेळाडूंसह खेळतात; विराट कोहली म्हणतो, मी अजूनही भारतीय... Video

MS Dhoni चा चित्रपट पाहून तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतला...

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Latest Marathi News Live Update : बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक जिंकणाऱ्या माजी नगरसेवकावर २० वर्षांनी गुन्हा

SCROLL FOR NEXT