Tipu Sultan Movie Sandeep Singh Esakal
मनोरंजन

Tipu Sultan Movie: टिपू सुलतान यांच्यावर चित्रपट नको रे बाबा! धमक्यांना निर्माता घाबरला...

Vaishali Patil

Sandeep Singh: चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केली ज्यामुळे ते अचानक चर्चेत आले. त्यांनी ट्विट करत एक मोठी घोषणा केली. म्हैसूरचे प्रसिद्ध राजे टिपू सुलतान यांच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती ते करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

संदीप सिंह यांनी सांगितले की, टिपूच्या अनुयायांकडून त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना धमक्या देण्यात येत आहे, त्यामुळे त्यांनी या चित्रपटावर काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जेव्हा संदीपने टिपू सुलतान चित्रपट बनवण्याची घोषणा केल्यापासूनच ते चर्चेत आले. त्यांनी घोषणा केल्यापासूनच त्यांना आणि त्याच्या जवळच्या लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत अधिकृत विधान शेअर केले आहे, या पोस्टमध्ये ते लिहितात की, 'हजरत टिपू सुलतान यांच्यावर चित्रपट बनवला जाणार नाही. मी माझ्या बंधू-भगिनींना यांना विनंती करतो की, मला, माझ्या कुटुंबाला, मित्रांना धमकावू नका.

माझ्याकडून अनवधानाने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची मनापासून माफी मागतो. सर्वांच्या श्रद्धांचा आदर करण्यावर माझा विश्वास आहे कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. भारतीय म्हणून आपण नेहमी एकजूट राहू या आणि एकमेकांचा आदर करू या.'

मे महिन्याच्या सुरुवातीला संदीप सिंह म्हणाले होते की, टिपू सुलतानबद्दलचं सत्य माहित झाल्यावर त्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाल शिवाजी किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चित्रपट सत्याच्या बाजूने उभे असतात, असेही ते म्हणाले.

इतकच नाही तर टिपू सुलतान हे सुलतान म्हणण्याच्या लायकीचे नव्हते आणि इतिहासाच्या पुस्तकात दिलेल्या शूर शब्दालाही ते पात्र नसल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

या चित्रपटाचे पोस्टरही मे महिन्यात रिलीज करण्यात आले होते. पोस्टरमध्ये टिपू सुलतान यांचा चेहरा शाईने रंगवण्यात आला होता. पोस्टर रिलीज झाल्यानंतर चित्रपटावर बराच वाद सुरू झाला. आता त्यांनी चित्रपटाचे पोस्टर डिलिज केले आहे.

संदीप सिंग हे प्रियांका चोप्राचा 'मेरी कॉम', रणदीप हुडा आणि ऐश्वर्या राय बच्चन स्टारर 'सरबजीत', विवेक ओबेरॉयचा बायोपिक ड्रामा 'पीएम नरेंद्र मोदी' आणि अमिताभ बच्चनचा स्पोर्ट्स बायोपिक चित्रपट 'झुंड' यासारख्या उल्लेखनीय आणि हिट चित्रपटांसाठी ओळखले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Cotton Market : कापूस बाजारात 'मंदीची' सरकी; १५ लाख गाठींचे उद्दिष्ट असताना साडेसात लाखांवरच हंगाम आटोपला!

रायगडाच्या पायवाटेवर 'कमळी'चा स्वराज्याचा जागर! चित्रीकरणादरम्यान विजया बाबर झाली भावूक; म्हणाली...

Jalgaon News : जळगावात थरार! सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे जळून खाक, डोळ्यांदेखत संसाराची झाली राखरांगोळी

Latest Marathi News Update : धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात ‘दूषित’ पाणीपुरवठा

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT