prof hari narke passed away hemangi kavi emotional post and consoled daughter pramitee narke SAKAL
मनोरंजन

Hari Narke: बाबांच्या विचारांची, कार्याची ज्योत तेवत ठेवायचीय! प्रा. हरी नरकेंच्या मुलीचं हेमांगी कवीने केलं सांत्वन

हेमांगी कवीने प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय आणि त्यांच्या मुलीचं सांत्वन केलं

Devendra Jadhav

Hari Narke Passes Away: समता परिषदेचे उपाध्यक्ष आणि लेखक विचारवंत प्रा. हरी नरके यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. हरी नरकेंच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि ईतर क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी शोक व्यक्त केलाय.

अशातच अभिनेत्री हेमांगी कवीने प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. याशिवाय त्यांची मुलगी आणि अभिनेत्री प्रमितीचं सांत्वन केलंय

हेमांगी कवीची प्रा. हरी नरकेंना आदरांजली

हरी नरके सारख्या व्यक्तींच्या जाण्याने फक्त त्यांच्या घरातल्यांचं नाही तर अख्ख्या समाजाचं नुकसान होतं! Sir, तुम्हांला भेटायचं राहून गेलं. पण तुमचे विचार, तुमचा अभ्यास, तुमची पुस्तकं कायम मार्गदर्शक ठरतील!

प्रमिती तुझ्यासाठी हा किती मोठा धक्का असू शकतो याची मला कल्पना सुद्धा करवत नाहीय. Take care dear! बाबांच्या विचारांची, कार्याची ज्योत तेवत ठेवायचीए! अशी पोस्ट करत हेमांगीने प्रा. हरी नरकेंना श्रद्धांजली वाहिलीय.

प्रा. हरी नरकेंचं निधन कसं झालं?

मुंबईतील एशिअन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मागील वर्षभरापासून हरी नरके आजारी होते. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात १५-२० दिवस दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक-दोन महिन्यापूर्वी राजकोट येथील रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती.

आज ते मुंबईला येत असताना प्रवासात सहा वाजताच गाडीत त्यांना दोन उलट्या झाल्या. त्यानंतर समिर भुजबळ यांनी ड्रायव्हरला एशियन हार्ट घेऊन जाण्यास सांगितलं, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

प्रा. हरी नरकेंची साहित्यसंपदा

प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, हे त्यांचे पुस्तके प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. सोशल मीडियावर ते सतत सक्रीय होते.

अनेक सामाजिक विषयांवर ते थेट भाष्य करत असतं. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला होता. त्यांचे अनेक लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT