Project-K First look poster of Deepika Padukone revealed Esakal
मनोरंजन

Project K: पहाटे 'सालार' टिझर रिलिज तर आता मध्यरात्री प्रभास अन् दिपिकाच्या 'प्रोजेक्ट के' चा नवा धमाका!

'प्रोजेक्ट के' चित्रपटात सुपरस्टार प्रभाससोबत बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. दीपिका आणि प्रभास स्टारर चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

Vaishali Patil

Project-K First look poster of Deepika Padukone revealed: गेल्या काही दिवसांपासून प्रभासचा 'प्रोजेक्ट के' सतत चर्चेत आहे. आदिपुरुष फ्लॉप गेल्यानंतर आता प्रभासचे चाहते त्याच्या 'प्रोजेक्ट के' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपुर्वी प्रभासच्या 'सालार'चा टिझर रिलिज करण्यात आला होता.

हा टिझर पहाटे साडे पाचच्या सुमारास रिलिज करण्यात आला. त्यात आता प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' च्या निर्मात्यांनीही रात्री उशिरा चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले.

'प्रोजेक्ट के' चित्रपटात सुपरस्टार प्रभाससोबत बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. दीपिका आणि प्रभास स्टारर चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

बिग बजेट चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस वैजयंती मुव्हीजने सोमवारी चित्रपटाचे पोस्टर रिलिज होणार असल्याची घोषणा केली. परंतु संध्याकाळी तो रिलीज झाला नाही. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली.

शेवटी, एक मोठे सरप्राईज देत निर्मात्यांनी सोमवारी रात्री उशिरा दीपिकाचा फर्स्ट लूक शेअर केला. या पोस्टरमध्ये दीपिका एका इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे. टाईम्स स्क्वेअरमध्ये 'प्रोजेक्ट के'चा होर्डिंग दिसला

'प्रोजेक्ट के' 12 जानेवारी 2024 रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात तगडी स्टार कास्ट आहे. ज्यात दीपिका पदुकोण आणि प्रभासशिवाय कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी देखील दिसणार आहेत. नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

त्याचबरोबर सॅन दिएगो कॉमिक-कॉन इंटरनॅशनल इव्हेंट जो कॅलिफोर्नियात होणार आहे त्यात प्रभास-दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्या 'प्रोजेक्ट के' चित्रपटाचे काही शॉट दाखवण्यात येणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

SCROLL FOR NEXT