Project K Makers Big Announcement Free Merchandise Of Prabhas Deepika Padukone Film For Fans tweet viral  Esakal
मनोरंजन

Project K: चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कायपण! आता प्रोजेक्ट केच्या निर्मात्यांची चाहत्यांसाठी खास ऑफर

Vaishali Patil

साउथ सुपरस्टार प्रभास हा आदिपुरुष चित्रपटामुळे चर्चेत होता. मात्र या चित्रपटाने त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. तसचं समिक्षकांनीही या चित्रपटाला खुप कमी रेटिंग दिली. या चित्रपटामुळे बराच वादही झाला. आता प्रभास त्याच्या आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के' रिलिज होणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

तेलुगू सिनेमातील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसपैकी एक असलेल्या वैजयंती मूव्हीजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 20 जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये 'प्रोजेक्ट के' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार अशी बातमीही समोर आली आहे.

तर आता दुसरी बातमी आली आहे. 'प्रोजेक्ट के' चित्रपटाचे निर्माते चित्रपटाची मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता प्रभास यांच्या चाहत्यांना मोफत मर्चेंडाइज देणार आहेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रोजेक्ट के नवा रेकॉर्ड करण्यासाठी तयार आहे. San Diego Comic-Con 2023 मध्ये पदार्पण करणारा हा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे.

अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन यांच्या 'प्रोजेक्ट के' चे टायटल , रिलीजची डेट आणि ट्रेलर 20 जुलै रोजी येणाऱ्या कॉमिक कॉनमधुन चाहत्यांना कळणार आहे. त्यमुळे आता चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दलही चाहते खूप उत्सुक आहेत.

प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यासोबत ही बातमी शेयर केली आहे. चित्रपटाच्या सेलेब्सशी या वस्तू चाहत्यांना मोफत देण्यात येणार आहे. निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे करत आहे. मात्र निर्मात्यांच्या या निर्णयामुळे चाहते खूपच उत्साहित झाले आहेत.

'प्रोजेक्ट के' बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चाहत्यांच्या उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी चित्रपटात मुख्य भुमिकेत असलेले बिग बी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले, "#ProjectK म्हणजे काय? जगाला जाणून घ्यायचे आहे.

सी. आसवानी दत्त यांच्या वैजयंती मूव्हीज द्वारे निर्मित करण्यात आलेल्या आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते नाग अश्विन दिग्दर्शित, 'प्रोजेक्ट के' हा द्विभाषिक चित्रपट आहे. ज्याचे शुटिंग हिंदी आणि तेलुगूमध्ये करण्यात आले आहे. दीपिकाचे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT