pulkit samrat and kriti kharbanda secret engagement photos viral  SAKAL
मनोरंजन

Pulkit - Kriti Engagement: पुलकित-क्रितीने गुपचुप उरकला साखरपुडा? अंगठी दाखवत केला जाहीर खुलासा

पुलकित - क्रितीने गुपचुप साखरपुडा केल्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

Pulkit Samrat - Kriti Kharbanda Engagement News: तब्बल 4 वर्षे डेट केल्यानंतर पुलकित सम्राटने त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री क्रिती खरबंदासोबत साखरपुडा केलाय.

पुलकितने त्याच्या मित्राच्या घरी गुपचुपरित्या हा साखरपुडा केल्याची चर्चा आहे. पुलकित आणि क्रितीच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या दोनपैकी एका फोटोमध्ये क्रिती तिची एंगेजमेंट रिंग फ्लाँट करताना दिसत आहे. ती पुलकितसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये उभी आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघेही कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत उभे आहेत.

पुलकित अन् क्रितीचे हे फोटो एका यूजरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. क्रिती आणि पुलकित त्यांच्या मित्रांसोबत मजा - मस्ती करताना दिसत आहेत.

गोल्डन बॉर्डर असलेल्या रॉयल ब्लू अनारकली ड्रेसमध्ये क्रिती खूपच सुंदर दिसत आहे. तर या एंगेजमेंट सोहळ्यासाठी पुलकित सम्राटने फ्लोरल प्रिंट असलेला पांढरा कुर्ता निवडला.

यामध्ये तो खूपच देखणा दिसत होता. क्रितीने तिची एंगेजमेंट रिंगही दाखवली आहे. पुलकित आणि क्रितीचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

पुलकित सम्राटने यापूर्वी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, "तो आणि क्रिती एकमेकांना पूरक आहेत. दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स असून एकमेकांच्या कामाचं कायम कौतुक करत असतात. याशिवाय कामावर फोकस करुन दोघेही एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात."

पुलकित - क्रितीने साखरपुड्याचा अधिकृत खुलासा केला नसला तरीही दोघांचे चाहते भरभरुन अभिनंदन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT