Pulkit Samrat And Kriti Kharbanda esakal
मनोरंजन

Pulkit Samrat And Kriti Kharbanda: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल; काय आहे खास?

Pulkit Samrat And Kriti Kharbanda: सोशल मीडियावर क्रिती आणि पुलकित यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. क्रिती आणि पुलकित यांची लग्नाची पत्रिका खास आहे.

priyanka kulkarni

Pulkit Samrat And Kriti Kharbanda: अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) हे बॉलिवूडमधील क्युट कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आता सोशल मीडियावर क्रिती आणि पुलकित यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. क्रिती आणि पुलकित यांची लग्नाची पत्रिका खास आहे. या पत्रिकेतील काही गोष्टींनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

क्रिती आणि पुलकितच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो व्हायरल

क्रिती आणि पुलकितच्या लग्नपत्रिकेत प्रेम, संगीत आणि एक सुंदर नजारा बघायला मिळत आहे.क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या लग्नाच्या कार्डमध्ये दोघे जण खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. पुलकित हातात गिटार घेऊन बाल्कनीत बसला आहे आणि त्याच्यासोबत क्रितीही बसली आहे. आजूबाजूला काही कुत्रे आहेत. कार्डवर लिहिले आहे, "आमच्या लोकांसोबत उत्सव साजरा करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही-पुलकित आणि कृती."

कधी होणार क्रिती आणि पुलकित यांचे लग्न?

पुलकित आणि क्रिती यांनी अजून त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. रिपोर्टनुनसार, पुलकित आणि क्रिती हे 13 मार्चला सात फेरे घेणार आहेत. पुलकित आणि क्रिती हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी क्रितीनं पुलकितसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला होता. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "लेट्स मार्च टू गेदर". तेव्हापासूनच क्रिती आणि पुलकित यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं.

क्रिती आणि पुलकितची लव्ह स्टोरी

क्रिती आणि पुलकितच्या लव्ह स्टोरीला पागलपंती या चित्रपटापासून सुरुवात झाली. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीने पुलकितला डेट करत असल्याचं सांगितलं होतं.

पुलकितनं सलमानच्या बहिणीशी केलं होतं लग्न

2014 मध्ये पुलकितनं श्वेता रोहिरासोबत लग्नगाठ बांधली होती. श्वेता ही सलमान खानची 'राखी सिस्टर' आहे. पुलकित आणि श्वेता यांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला.

क्रिती आणि पुलकित यांचे चित्रपट

जय हो, फुकरे, फुकरे रिटर्न्स या चित्रपटात पुलकितनं काम केलं. तर हाऊसफुल 4, यमला पगला दिवाना,शादी में जरूर आना या चित्रपटात क्रितीनं काम केलं आहे. पागलपंती या चित्रपटात पुलकित आणि क्रिती या दोघांनी काम केलं आहे.क्रिती आणि पुलकित यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT