Lata Mangeshkar Anniversary sakal
मनोरंजन

Lata Mangeshkar Anniversary: पांढऱ्या साडीतील एक साधीशी व्यक्ती किती महान आहे ते त्याक्षणी जाणवलं

देश-परदेशांत अनेक कार्यक्रमांच्या दौऱ्याआधी त्या कसून रिहर्सल करायच्या. वक्तशीर, शिस्तबद्ध असा तो त्यांचा वावर आम्हालाही प्रेरित करायचा

सकाळ वृत्तसेवा

पुणे- परांजपे म्हणाले, ‘‘दीदी म्हणजेच लताबाई मंचावर आपल्यापासून तीन-चार फुटांवर उभ्या राहून गात आहेत, श्रोते मंत्रमुग्ध झाले आहेत आणि आपण त्यांना की बोर्डवर साथ करतो आहोत, हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. दर वेळी तेवढाच निस्सीम आनंद व्हायचा. मनात यायचं की, दैवी आवाज लाभलेल्या या गायिकेला अचूकतेचा किती ध्यास आहे?

गात असताना त्यांना साथीदारांच्या नेमकेपणाबद्दलही भान असायचे. एखाद्या साथीदाराला काही सूचना द्यायची असल्यास त्या, अशा कार्यक्रमांसाठीचे त्यांचे नेहमीचे संगीत संयोजक अनिल मोहिले यांना हळूच जवळ बोलावून शांतपणे एखादे वाक्य सांगत. मला आणखी एक नवल वाटायचे. त्यांच्या स्वरांत अगोदरच ध्वनिमुद्रित होऊन लोकप्रिय झालेले कोणतेही गाणे गाताना त्या मूळ चालीबरहुकूम गात. त्यातील मूळ जागाही तशाच घेत.

एवढ्या सिद्धहस्त गायिकेला त्या गाण्यात आयत्यावेळी हवी ती तान, हरकत सहज घेता आली असती, पण तसे त्यांनी क्वचितच केले. तेही अगदीच बारीकसे. मूळ गाण्याच्या आत्म्याला धक्का न लावता. प्रत्येक कार्यक्रमात थोडीफार बदललेली गाणी असली तरी ‘अजीब दास्ताँ है ये’, ‘आ जा रे, परदेसी’, ‘कुछ दिल ने कहा’ वगैरे काही मात्र कायम असायची.

‘आ अब लौट चलें’ यासारख्या गाण्यातील एक विलक्षण तान घेताना दीदींचा आवाज वरच्या सप्तकात सहजपणे जाऊन, कितीतरी वेळेपर्यंत निनादून अलगद खाली यायचा. ते ऐकताना रोमांच येत. ही भरारी घेताना त्या आवाज कसा वापरत असतील? इतक्या उंच नेलेला आवाज कणभरही ताणलेला, कृत्रिम वाटत नसे. शेवटच्या कालपर्यंत टिकलेला दमसास. कमालीची आर्ततेने भरलेली, त्यांची ती पुकार अगदी काळजाला भिडायची.’’

परांजपेंनी असेही सांगितले की, देश-परदेशांत अनेक कार्यक्रमांच्या दौऱ्याआधी त्या कसून रिहर्सल करायच्या. वक्तशीर, शिस्तबद्ध असा तो त्यांचा वावर आम्हालाही प्रेरित करायचा. मी त्यावेळी किशोरकुमार, आशा भोसले व लताबाई या तिघांच्याही कार्यक्रमांत साथ करायचो. यांपैकी कोणत्याही दोघांचे कार्यक्रम त्याचवेळी, असे योगायोगाने घडले नाही. त्यामुळे मी तिघांच्याही कार्यक्रमांत वाजवत राहिलो.

किशोरदा व आशाबाईंच्या कार्यक्रमांना तर मी साथ करणारा व संगीत संयोजक, या दोन्ही भूमिकांमध्ये असायचो. एका कार्यक्रमात किशोरदा आणि लताबाई हे दोघेही होते. हा अनुभव गमतीदार होता. किशोरदांच्या गाण्यावेळी मी दोन्ही भूमिकांमध्ये व दीदी मंचावर येताच मोहिले संगीत संयोजकाच्या भूमिकेत आणि मी फक्त साथीदाराची जबाबदारी पार पाडतोय, हे आलटूनपालटून चालले होते.

परदेशांतील कार्यक्रमांत तेथील वादकांबरोबर इथले आम्ही काही मोजके, असेही होई. मोहिले अगोदर तिकडे पाश्चात्य धर्तीच्या स्वरलिपीत गाणे पाठवत. मग आम्ही गेल्यावर रिहर्सल चालायची. दीदी समाधान होईपर्यंत हे सारे निगुतीने करायच्या. पांढऱ्या साडीतील एक साधीशी दिसणारी व्यक्ती किती मोठी आहे, हे तेव्हाही जाणवून मी नतमस्तक व्हायचो. पूर्वीपेक्षाही जास्तच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT