Puneet Superstar social media influencers viral new car  
मनोरंजन

Puneet Superstar : रस्त्यावरील भुकेल्यांना जेवण देण्यासाठी घेतली नवीन कार

बिग बॉस ओटीटीमध्ये गैरवर्तन आणि बेशिस्तपणे वागल्याप्रकरणी त्याच्यावर मेकर्सनं कारवाई केली आहे.

युगंधर ताजणे

Puneet Superstar social media influencers viral : सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या इन्फ्ल्युंर्समध्ये ज्याच्या नावाची नेहमीच चर्चा असते त्या पुनीत कुमारचा एका नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आपण आपल्या चाहत्यांची कशी काळजी घेतो हे त्यानं सांगितले आहे. बिग बॉस ओटीटीमधून पहिल्याच दिवशी पुनीतला बाहेर जावं लागल्यानं त्याच्या चाहत्यांची निराशा केली आहे.

बिग बॉस ओटीटीमध्ये गैरवर्तन आणि बेशिस्तपणे वागल्याप्रकरणी त्याच्यावर मेकर्सनं कारवाई केली आहे. त्यामुळे पुनीतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर ज्याचे लाखो चाहते आहेत अशा पुनीतला एकाएकी बिग बॉसमधून बाहेर पडावे लागल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र यासगळ्यात पुनीतनं देखील आपण काही कमी नाही हे सांगितले आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती पुजा भट्टशी वाद घालणं त्या पुनीतला महागात पडलं आहे. मुळातच पुनीत हा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे प्रसिद्ध आहे. तो काहीही करु शकतो हे त्यानं आजवरच्या व्हिडिओमधून दाखवून दिले आहे.

त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे दिसून आले आहे. पुनीत हा भलेही त्याच्या अतरंगी वागण्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय असेल पण त्याची गरीबांप्रती असलेली सहानुभूती यामुळे तो प्रसिद्धीत राहिला आहे.

पुनीतनं आता गरीबांना जेवण देण्यासाठी एक नवीन कार घेतली आहे. त्याबाबत त्यानं एक वेगळा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यावर त्याला नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत.

पुनीत हा दररोज काही गरीब लोकांना त्याच्यावतीनं मोफत जेवणाचे वाटप करत असतो. आता त्यानं ते जेवण देण्यासाठी नवीन कार खरेदी केल्यानं अनेकांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात

Viral Video: 'स्टॅन स्टॅन' बनून रिषभ पंतचा धमाका! न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्लबसाठी सिक्सचा पाऊस पाडत केलं अर्धशतक

Latest Marathi News Live Update: अशैक्षणिक कामे थांबवा, शिक्षकांना त्यांचे मूळ काम करू द्या!

Pune Crime : रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणाचा खून; आठ जणांना जन्मठेप

SCROLL FOR NEXT