Puneet Superstar's Instagram Account Gets Disabled, fans blamed mc stan fan army bigg boss ott 2 SAKAL
मनोरंजन

Puneet Superstar: पुनित सुपरस्टारचं इन्स्टाग्राम अकाऊंट हटवलं, MC Stan अन् पुनीतच्या फॅन्समध्ये मोठा राडा

पुनित सुपरस्टारचं अकाऊंट Removed होण्यात MC Stan Army चा मोठा वाटा असल्याचं सांगण्यात येत आहे

Devendra Jadhav

Puneet Superstar News: अलीकडेच Bigg Boss OTT 2 मधुन प्रसिद्धीझोतात आलेला पुनित सुपरस्टारची त्याच्या फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ आहे. पुनित सुपरस्टारचे व्हिडीओ, त्याची भाषा अशा अनेकांची सोशल मिडीयावर चर्चा असते.

पुनितच्या फॅन्सने आता सोशल मिडीयावर आता एकच गदारोळ केलाय. पुनितच्या इंन्स्टाग्राम अकांऊंट Removed झालं असल्याची चर्चा सुरु झालीय. काय आहे प्रकरण सविस्तर जाणुन घेऊ..

(Puneet Superstar's Instagram Account Gets Disabled)

पुनितचं अकाऊंट हटवलं

पुनीत सुपरस्टार सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे जवळपास 3.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. पुनित त्याच्या विचित्र व्हिडिओंनी हसवतो, तर काही लोकांना त्याचे व्हिडिओ खूपच भयंकर वाटतात.

आता अलीकडे, पुनीत सुपरस्टारचे अकाऊंट इंस्टाग्रामवर दिसत नाही, ज्याचे अनेक स्क्रीनशॉट त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर देखील शेअर केले आहेत.

पुनितचे अकाऊंट बंद झाल्याने त्याचे अनेक चाहते संतापले असून पुनीतचे अकाऊंट परत आणावं म्हणु मागणी करताना दिसत आहेत.

पुनितच्या फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया, MC Stan ला दिला दोष

सोशल मीडियावर पुनीतचे अनेक चाहते असेही म्हणतात की, पुनीतच्या खात्यावर रॅपर एमसी स्टेनच्या आर्मीच्या म्हणजेच फॅन्सनी रिपोर्ट करुन अनेक वेळा तक्रार केलीय. ज्यामुळे पुनितचे खाते इन्स्टाग्रामवरुन काढून टाकण्यात आले आहे.

पुनीत सुपरस्टारचे इन्स्टाग्राम अकाऊंट गायब झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना राग अनावर झालाय. अनेक फॅन्सनी इन्स्टाग्रामला दोष दिलाय. एका युजरने ट्विट केले की, "पुनीत सुपरस्टारच्या खात्याची mc stan's Army ने अनेक वेळा तक्रार केली आहे. त्यामुळे त्याचे खाते लॉक झाले आहे".

दुसर्‍या युजर्सने लिहिले की, "इन्स्टाग्रामने पुनित सुपरस्टारचे खाते काढून टाकले आहे कारण एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी त्याची अनेकदा तक्रार केली आहे". एकुणच पुनित सुपरस्टारचं अकाऊंट Removed होण्यात MC Stan च्या फॅन्सचा मोठा वाटा आहे, अशी चर्चा आहे.

पुनितला बिग बॉस OTT 2 मधुन बाहेर काढलं

पुनीत सुपरस्टारला बिग बॉस OTT 2 मध्ये स्पर्धक म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर 12 तासांत पुनीतला घरातून बाहेर काढण्यात आले.

बिग बॉसच्या इतिहासात आजपर्यंत एकही सदस्य इतक्या लवकर घरातून बाहेर पडलेला नाही. हा स्वतःच एक विक्रम आहे.

पुनीतला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घरातील कुटुंबीयांच्या सामूहिक मतदानाच्या आधारे घेण्यात आला. कारण पुनीतसोबत हे सदस्य घरात राहू शकत नाही, असे सर्वांचे मत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Nagpur Election: प्रभाग रचनेने धक्का, आता आरक्षणावर नजर; किरकोळ बदलांसह महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांमध्ये नाराजी

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

SCROLL FOR NEXT