punit  
मनोरंजन

पुनीत पाठकचा पत्नी निधीसोबत शाहरुख खानच्या गाण्यावर रोमँटिक डान्स, व्हिडिओ व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- कोरिओग्राफर पुनीत पाठक नुकताच गर्लफ्रेंड निधी सिंहसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नात मोहन सिस्टर्स शक्ति मोहन-मुक्ती मोहनसोबतंच कॉमेडिअन भारती सिंह, हर्ष लिम्बचिया आणि मॉनी रॉयसोबत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. पुनीत पाठक आणि निधी सिंहच्या लग्नाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. अशातंच आता या जोडीचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ समोर आला आहे.  

पुनीत आणि निधी यांच्या लग्नात घरातील सदस्यांपासून ते इंडस्ट्रीतील मित्र मैत्रीणींसह  सगळ्यांनी जबरदस्त डान्स धमाल केली. यादरम्यान कित्येक व्हिडिओ समोर आले. मात्र पुनीत आणि निधी यांचा नवीन रोमँटिक डान्स व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय. या व्हिडिओमध्ये ही जोडी सुपरस्टार शाहरुख खानच्या गाण्यावर रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. हे दोघंही शाहरुखच्या 'जब तक जहां में' या गाण्यावर थिरकत आहेत. दोघांना आजुबाजुचे सगळेच चिअर अप करत आहेत.

पुनीत आणि निधीचा हा डान्स व्हिडिओ अभिनेत्री मुक्ती मोहनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. याशिवाय मुक्ती मोहनने पुनीतच्या रिसेप्शनमध्ये त्याच्यासोबत मस्ती करतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये मुक्ती, शक्ती, डान्सर दिपक, पुनीत पाठकसोबत अक्षय कुमारच्या 'जोर का झटका' या गाण्यावर नाचत आहेत. 

पुनीत पाठक 'डान्स प्लस' या शोचा परिक्षक होता. यामध्ये परिक्षक म्हणून त्याच्यासोबत शक्ती मोहन, धर्मेश सर होते. राघव जुयाल या शोचा सुत्रसंचालक होता तर ग्रँड मास्टर ही जबाबदारी रेमो डिसूजा यांनी पार पाडलेली.   

punit pathak romantic dance on shah rukh khan song with nidhi singh video goes viral  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT