mohan agashe, mohan agashe news, mohan agashe punyabhushan SAKAL
मनोरंजन

Mohan Agashe: ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा 'पुण्यभुषण 2023' पुरस्कार जाहीर

मोहन आगाशे यांच्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे

Devendra Jadhav

Mohan Agashe News: मोहन आगाशे हे मराठी, हिंदी आणि भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. मोहन आगाशे यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मोहन आगाशे यांच्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

'पुण्यभूषण फाऊंडेशन'तर्फे गेली 33 वर्षे सातत्याने पुण्यभूषण हा पुरस्कार देण्यात येतो. फक्त भारतात नाही तर परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराचा 2023 या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदाना करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Dr. Mohan Agashe ) यांना देण्यात येणार आहे.

('Punyabhushan 2023' award goes to veteran actor dr. Mohan Agashe)p

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील या पुरस्कारानं गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.

जुलै महिन्यात हा दिमाखदार सोहळा होणार असून या पुरस्कराचे यंदाचे 34 वे वर्ष आहे. सलग 33 वर्षे संस्थेने,

संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला. स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे.

याबरोबरच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या 5 जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

त्यामध्ये सेलर राधाकृष्णन, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा गौरव करण्यात येणार आहे.

यापूर्वी विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोचविणाऱ्या 33 ज्येष्ठ पुणेकरांना गौरविण्यात आले आहे.

आधी कोणाला मिळालाय पुण्यभूषण?

तर महामहिम माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी , मनोहर जोशी, खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे सर्वच माजी मुख्यमंत्री, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव, सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले,

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदूचे संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार,

डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायण मूर्ती, शरद यादव, नितीन गडकरी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. अमदजअली खान आणि पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT