pushkar jog comment on marathi movies not getting theatre in maharashtra baapmanus movie  SAKAL
मनोरंजन

Pushkar Jog: "प्रेक्षक मराठी सिनेमे बघत नाहीत म्हणुन...", महाराष्ट्रात चित्रपटांना थिएटर न मिळण्याबाबत पुष्कर जोगने मांडली खंत

पुष्करच्या सिनेमाला थिएटर मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केलीय. काय म्हणाला पुष्कर पाहूया.

Devendra Jadhav

बिग बॉस मराठी फेम अभिनेता पुष्कर जोग हा चाहत्यांचा लाडका अभिनेता. पुष्करचं सोशळ मिडीयावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. पुष्करने आजवर विविध सिनेमांंमधुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

पुष्कर त्याच्या आगामी बापमाणुस सिनेमामुळे चर्चेत आहे. पुष्करचा बापमाणुस सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पण पुष्करच्या सिनेमाला थिएटर मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केलीय. काय म्हणाला पुष्कर पाहूया.

थिएटर मालकांकडे आम्हाला भीक मागावी लागते

बापमाणुस निमित्ताने पुष्कर सध्या विविध माध्यमांना मुलाखती देतोय. त्यावेळी MahaMTB चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पुष्करने मनातली खंत व्यक्त केली. पुष्कर म्हणाला, “बापमाणुस सिनेमाच्या विषयानुसार मला हा सिनेमा फादर्स डेला रिलीज करायचा होता. पण, महाराष्ट्रात राहूनही आपल्या मातीत मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळत नाही याहून मोठं दुर्दैव नाही. आपल्या मराठी चित्रपटांचे शो लावण्यासाठी थिएटर मालकांकडे भीक मागावी लागते. मुंबईत बॉलीवूडसह स्पर्धा होत असल्याने याचा फटका अनेकदा मराठी सिनेमांना बसतो.”

प्रेक्षक मराठी चित्रपट पाहायला जात नाहीत

पुष्कर जोग पुढे म्हणाला, “आमच्या सिनेमा बापमाणुसला शो मिळत नाहीत आणि आम्हाला चित्रपटगृहांकडे भीक मागावी लागते ही वस्तूस्थिती आहे. जून महिन्यात ‘बापमाणूस’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण, त्यावेळी दोन हिंदी आणि एक इंग्रजी चित्रपट सिनेमागृहांमध्ये सुरु असल्याने आम्हाला शो मिळाले नव्हते. मुंबईत मार्व्हल, सुपरहिरोंचे इंग्रजी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक जातात पण, मराठी चित्रपट पाहायला जात नाहीत…हे दुर्दैव आहे. त्यामुळेच नाईलाजाने आम्हाला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली.”

हिंदी सिनेमांसाठी मराठी सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलावी लागते

पुष्कर जोग शेवटी म्हणाला, “२५ ऑगस्टच्या दरम्यान दोन मराठी चित्रपट रिलीज होणार होते. त्यातला महत्वाचा सुभेदार महत्वाचा सिनेमा. पण मला माझा सिनेमा मराठी निर्मात्यांबरोबर स्पर्धेत आणायचा नव्हता.

कारण, मराठी चित्रपटांना आधीच फार कमी शो मिळतात. याशिवाय ७ सप्टेंबरला जवान रिलीज होतोय असा सगळा विचार करुन मी चित्रपटासाठी १ सप्टेंबर तारीख निश्चित केली. पण थिएटर मिळत नसल्याने मराठी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणं ही फार वाईट गोष्ट आहे.”

पुष्कर जोगचा आगामी बापमाणुस सिनेमा १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT